कामाच्या गोष्टीमाझं गाव

लेकीचे लग्न थांबवून शेतकऱ्याने पेरणी केली,’ या ‘ रोगाने उभ्या पिकाची ही अवस्था केली.

शेतकऱ्यांसाठी शेती ही आपल्या एखाद्या लेकरा सारखेच असते तिची मशागत करायची तिच्यामध्ये पीक पेरायचं , उभे पीक आलं की त्याचं उत्पादन करून आपली रोजीरोटी कमवायचे कधी कधी या शेतामध्ये पेरणी करून मशागत करून सुद्धा कुठलंही पीक येत नाही. तरीदेखील काळया आईवरची माया प्रेम शेतकऱ्याचं कधीही कमी होत नाही शेतकऱ्यांसाठी शेती हा सर्वात मोठा खजिना असतो. मात्र शेती करत असताना शेतकऱ्यावर अनेक अस्मानी संकट येतात. कधी दुष्काळ, कधी दुबार पेरणी, कधी बी बियाणे ची फवारणी, कधी बी खराब लागणार कधी कीड यासारख्या अनेक गोष्टींमुळे शेतकरी हतबल होतो. शेतीमधील पीक जरी चांगला आलं तरी बाजार भाव कधी कधी कमी असतो त्यामुळे कवडी मोलामध्ये शेतकऱ्याला आपलं धान्य विकावे लागतात शेतकरी शेतामध्ये राबराब राबत असतो जेणेकरून त्याच पिक चांगला येऊन त्याचा बाजार भाव येईल आणि तो आपल्या कुटुंबासाठी चांगलं काहीतरी करु शकेल अशाच एका उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांने लेकीचं लग्न म्हणून त्यानं पेरणी केली मात्र उभं पिक गोगलगायने खाल्लं त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आल.

भारत देश हा कृषीप्रधान देश आहे पण भारतातला शेतकरी हा संपूर्ण कृषिप्रधान झाला पाहिजे. शेतकऱ्यावर प्रत्येक वेळेस कसले ना कसले संकट येत असते. पण तरीदेखील तो शेतकरी आजपर्यंत कधीही घरी राहिला आला नाही, तो सर्व अडचणीवर मात करून शेती पिकवतो शेतकरी म्हटला की त्याच्या मागे कधी दुष्काळ, कधी नापिकी, कधी कमी भाव तर कधी अतिरिक्त पाऊस अशा विविध प्रकारच्या अडचणी यांना सामोरे जाऊन तो आपले पीक उभा करत असतो. शेतात राबून घर कर्ज व मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची चिंता शेतकऱ्यांना नेहमीच सतावत असते पण आजकाल शेतकर्‍यांसमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे शेतकरी हा शेती करताना उसने पासने करून उसने पासने करून कशीबशी खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली पण पीक उगवत असताना त्यावर गोगलगाई तुटून पडल्या सोयाबीनचे पीक उगवण्या आधीच गोगलगायी हे पीक खाऊन टाकल .

उस्मानाबाद जिल्ह्यांमधील शेतकरी पुन्हा एकदा संकटामध्ये सापडले आहेत या गोगलगायींच्या पाठीवर शंख आणि आकाराने लहान असणाऱ्या गोगलगाई ने शेकडो हेक्टर सोयाबीनच्या पिकाचा सुपडा साफ केल. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची वेळ आली, आधीच शेतकर्‍यांना मोठ्या खर्चाला तोंड द्यावे लागते ही पेरणी करत असताना बी-बियाणे खते खरेदी करण्यासाठी पैसे उभे करताना अनेक तडजोडी करत शेती करायची त्यात आता या गोगलगायीचा प्रादुर्भाव मुळे पहिली केलेली पेरणी किंवा पहिल्या पेरणी साठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे पेरणीच्या खर्चाची चिंता आज-काल शेतकऱ्यांना सतावत आहे सोयाबीन एक झाड असेल तर त्याला दोन दोन गोगलगाय खाऊन पूर्ण झाड संपवून गेले. गोगलगायी ची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र तरीदेखील पिकांना वाचवण्यासाठी चोराखळी वडगाव कन्हेरे वाडी गावातील काही शेतकरी गोगलगाय शेतातून वेचत आहेत. सध्या तरी या अडचणीवर कोणताच पर्याय नसल्याने पदरात निराशा येते. या संकटावर ती लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे मागणी करण्यात आली. शेतकरी पैशांची बचत करून बँकेकडून कर्ज पाहुण्यांकडून उसने पैसे घेऊन महागडी खते बी-बियाणे हे विकत घेतात.

शेतकरी ज्ञानेश्वर बाराते यांनी तर आपल्या लाडक्या लेकीचे लग्नच पुढे ढकलले. साधारणता एका एकर ची जर पेरणी करायची असेल तर पाच ते सहा हजार रुपये एवढा खर्च येतो मात्र या गोगलगायी पीक खाऊन टाकतात. जर एकरी एवढा खर्च येत आहे तर आता जेव्हा दुबार पेरणी करायची आहे तर पैसे कुठून आणावेत असा प्रश्न आता या शेतकऱ्यांला पडला आहे यामध्ये कृषी विभागाने गलगायीचा वाढता धोका लक्षात घेऊन गोगलगायी पासून पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य वेळी पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करण्याचे आव्हान विभागाकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आता काय करावं हे काहीच कळत नाहीये पहिल्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना एवढा खर्च लागला त्याच तो खर्च करण्यासाठी पैशांची कशीबशी जुळवाजुळव केली बँकेकडून कर्ज घेतले पाहुण्यांकडून उसने पैसे आणले खाजगी सावकाराकडून कर्ज काढले आणि एवढं सगळं करुन सोयाबीनचे पीक उभे केले पण आता या गोगलगायी पीक येऊन देत नाही. हे एका झाडाला जर बघितले तर दोन-तीन अशा गोगलगायी असतात या गोगलगायी मुळे सोयाबीनचे सगळे पीक धोक्यात आहे सरकारने लवकर यावर काहीतरी उपाय काढावा अशी विनंती ज्ञानेश्वर बाराते या शेतकऱ्यांनी केली आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!