आधार संस्थेने राहुरीतील ‘ ह्या ‘ निराधार मायलेकींसाठी पाहा काय केल ?

आईसह समाज मंदिरात राहण्या-या निराधार वैष्णवी व गौरीला आधारने घेतले शैक्षणिक दत्तक..
ताहराबाद ता.राहुरी जि- अहमदनगर येथील वैष्णवी व गौरी घर नसल्याने आईसह समाज मंदिरात राहतात.
वडील ड्रायव्हर होते,पण दारुचे व्यसन… त्यातच टिबी झाल्याने दहा वर्षांपूर्वी वारले. मूळ कोल्हार येथील हे कुटुंब मामाच्या आधारने ताहराबाद येथे आले.पण तेही हातावर पोट भरुन उदरनिर्वाह करतात. आई गावातच मिळेल ते काम करीत मुलींना सांभाळते. पण तोडक्या मजुरीवर पोट भरणचं अवघड तेंव्हा मुलींना कसे शिकवायचे ??
सुट्टी असली की, मुलीही आईसोबत रोजाने जात कुटुंबाला मदत करतात. वैष्णवी यावर्षी दहावीला गेली. गुणही चांगले आहेत.. तिची शिक्षणाची हेळसांड सामाजिक कार्यकर्ते किरण घनदाट, रामदास सोनवणे यांना समजली. या परिवाराची संपूर्ण माहिती त्यांनी आधार फाऊंडेशन संस्थेला कळविली.
आधार फाऊंडेशन यावर्षी राज्यातील १७५ निराधार मुलांच्या शिक्षणासाठी समाजातील दानशूर बांधवांची मदत घेत काम करत आहे. आज वैष्णवी व गौरी यांना वह्या, पुस्तके,सॅक,शूज, आईला साडी आदी मदत समन्वयक विठ्ठल कडूसकर यांचे हस्ते दिली. गणवेशासाठी ११०० ₹ चा चेक दिला.
यावेळी आधार समन्वयक सुखदेव इल्हे, सामाजिक कार्यकर्ते व आधार सदस्य रामदास सोनवणे, किरण घनदाट,गणेश घनदाट,यश सब्बन उपस्थित होते.