अस काय घडलं ? ३ वर्षाची चिमुकली गाथा बुडाली !!

लहान मुलं म्हणलं की, आला खेळकर स्वभाव. एका जागी थांबतील ती लहान मुलं कसली. घरात किंवा बाहेर इकडून – तिकडे, तिकडून – इकडे सारखी बागडत असतात. लहान मुलांना सांभाळण्यासाठी एक माणूस तर स्पेशल लागतो. लहान मुलं ही देवाघरची फुले असतात. आपण काय करतोय काय नाही याबद्दल त्यांना अजिबातही ज्ञान नसतं. दिसेल त्या वस्तू सोबत दिसेल त्या ठिकाणी जाऊन ते खेळत असतात. आणि ते खेळत असताना जे घरातली मोठी व्यक्ती असतात त्यांनी या लहान मुलांकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं. त्यांच्या बारीक बारीक गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावे लागतात. कारण कोणत्या क्षणाला ते काय करतील काहीच सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वीच एक बातमी आपण सगळ्यांनी पाहिली असेल. आई फोनवर बोलत असताना तो मुलगा आधी आई सोबत खेळतो आणि नंतर तो एका मशीनला धरून झोका घ्यायला लागतो, आणि ती मशीन पक्की बसवलेली नसल्यामुळे ती त्याच्या अंगावर पडते आणि तो मुलगा त्याच ठिकाणी दम सोडतो. हे सर्व एका सेकंदामध्ये घडले त्यामुळे लहान मुले खेळत असताना आपल्याला त्यांच्याकडे खूप बारीक लक्ष द्यावे लागते.
या बातमीमध्ये देखील असंच काही घडलं आहे. ही घटना कोरेगाव खुर्द तालुका खेड या ठिकाणी घडली आहे. गाथा नितीन कडूसकर वय ३ वर्ष राहणार कोरेगाव खुर्द तालुका खेड असे या चिमुकलीचे नाव आहे. ही खेळत असताना शौचालयासाठी खोदलेल्या शोष खड्ड्यामध्ये पडून त्या चिमुकलीचा दुर्दैव दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. याआधी देखील चार ते पाच दिवसांपूर्वी आंबेठाण येथे अशीच घटना घडली होती. तीन भावंडांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता.
गाथा ही नितीन कडूसकर कुटुंबातील एकुलती एक कन्या होती. नितीन कडूसकर हे कोरेगाव खुर्द येथील माळवाडी भागात राहतत यांनी राहत्या घराच्या बाजूला शौचालयासाठी म्हणून काही दिवसापूर्वी एकशे खड्डा खोदला होता. आणि काही आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले. आणि त्यामुळे शौचालयाचे बांधकाम बंद ठेवण्यात आले आहे. घरात कागदासोबत ही चिमुकली खेळत होती आणि खेळता खेळता ती शोष खड्ड्याजवळ पोहोचली आणि तसाच तोल जाऊन ती त्या पाण्यात पडली. बराच वेळ झाला तरी गाथा दिसत का नाही म्हणून घरातल्या मंडळींनी तिचा आसपास शोध घेतला. तिचा शोध घेत असताना कागद पाण्यावर तरंगत असताना दिसून आलं तो कागद पाण्यावर तरंगत असताना प्राथमिक अंदाज व्यक्त करून तिचा त्या पाण्यात शोध घेतला. आणि पाण्यात शोध घेतला असता ती त्या पाण्यात आढळून आली.
ही घटना फक्त काही क्षणांमध्ये घडली तिने त्या कागदासोबत खेळावं काय, आणि त्या कागदासाठी त्या पाण्याच्या खड्ड्याजवळ जावं काय, आणि इकडे घरच्यांचा डोळा दुसरीकडे लागावा काय ? काही क्षणांमध्ये खेळती गाथा त्या सगळ्यांना सोडून गेली आणि त्या कडूसकर परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे लहान मुलं ही खेळकर असतात आणि त्यांच्याकडे बारीक लक्ष दिले पाहिजे. नाहीतर हे असं भलतंच काहीतरी घडून बसत.