‘ रुबाब – द परफेक्ट मेन्स शॉप ‘ फॅशनचा रुबाब आता गजाच्या आड !!
पुण्यातील होलसेल कपडा व्यवसायकाला फसवल्या प्रकरणी रुबाबचा संचालक सनी राजेंद्र जाधव यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी.
होलसेल कापड बाजाराची व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रुबाब द परफेक्ट मेन्स शॉप चा संचालक सनी राजेंद्र जाधव यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला असून त्याच्या विरोधामध्ये अटक वॉरंट सुद्धा निघाले आहे
पुणे येथील व्यावसायिक प्रतीक राजेश काबरा यांनी रुबाब शॉप चे नगर शाखेचे संचालक सनी जाधव यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक याने पुणे येथे ब्रँड जॉन अँड ॲक्सेसरीज होलसेल शोरूम चालवत आहे. सनी जाधव हे नगर मधील रुबाब शॉप साठी काबरा यांच्याकडून गेले तीन वर्षापासून माल खरेदी करत आहेत. सुरुवातीला सनी जाधव यांनी प्रतीक यांच्याकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे वेळोवेळी दिले. पुणे व्यावसायिक प्रतीक यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण केला. विश्वास निर्माण करून सदरील शॉप साठी कपड्यांचा माल उधारी वर घेण्यास सुरुवात केली
उधारी वाढत जाऊन उधारीच्या मालाची रक्कम सुमारे 18 लाख 78 हजार 672 रुपये एवढी झाली. आणि या घेतलेल्या मालाचे पैसे रोख न देता सनी यांनी वेगवेगळ्या रकमेचे चेक दिले. आणि त्याच प्रमाणे दिलेले चेक हे वेळेवर वटतील अशी खात्री देखील सनी जाधव यांनी प्रतीक काबरा यांना दिली. सनी जाधव यांनी प्रतीक काबरा यांना वेगवेगळ्या रकमेचे पाच चेक दिले त्याचप्रमाणे सनी जाधव यांनी सांगितले त्यानुसार सदरील चेक हे 18. 10. 2021 रोजी बँकेमध्ये जमा केले, पण हे सदरील चेक बँकेमध्ये न वटता २०.१०.२०२१ तारखेला पुन्हा माघारी आले. सनी जाधव यांनी दिलेले चेक वटले नाहीत असं फिर्यादी काबरा यांनी सनी जाधव यांच्याशी संपर्क साधून सांगितलं.
त्यावर सनी जाधव यांनी फिर्यादीला पुन्हा एकदा विश्वासात घेतलं आणि चेक 13.१०.२०२१ तारखेला बँकेत जमा करा असं सांगितलं. सनी जाधवच्या सांगण्यावरून प्रतीक काबरा यांनी पुन्हा एकदा चेक बँकेमध्ये जमा केले आणि यावेळेस सुद्धा ते चेक न वटता मागे आले. दुसऱ्यांदा असं घडल्यामुळे प्रतीक काबराही यांना जो सनी जाधव याच्यावर विश्वास होता तर तो विश्वास उडून गेला आणि आपली फसवणूक तर नाही ना झाली असं त्यांना एक वेळ वाटू लागलं. पण तरीदेखील यांनी सनी जाधव यांना फोन करून दुसऱ्या वेळेस सुद्धा ते चेक वटले नाही असं सांगितलं पण या वेळेला मात्र सनी जाधव यांनी प्रतीक काबरा याला उडवा उडवी चे उत्तर द्यायला चालू केलं.
यावरून प्रतीक काबरा याला सनी जाधव वर असणारा संशय खरा ठरला. सनी जाधव यांनी आपल्याला फसवलं याबाबत प्रतीक काबरा याचा अंदाज खरा ठरला आणि असं होताच सनी जाधव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रतीक काबरा यांच्या फिर्यादी वरून सनी जाधव यांच्या विरोधात 108 व कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक यांनी गुन्हा दाखल केला असताना दाखल झालेल्या गुन्ह्याला व न्यायालयीन प्रक्रियेला जाधव यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने न्यायालयाने सनी जाधव यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जाहीर केले आहे.