नगर ब्रेकिंग : बोल्हेगाव मध्ये पुतण्याने चुलत्यावर केले ब्लेड ने वार.
इतर शहरांप्रमाणे अहमदनगर मध्ये देखील गुन्हेगारी वाढत झाली आहे
मारामारी, चोरी, खून, बलात्कार यासारख्या घटना मोठमोठ्या शहरांमध्ये घडत असतात त्याचप्रमाणे अहमदनगर शहर सुद्धा आता मागे राहिले नाहीये. गुन्हेगारी मध्ये अहमदनगर चा देखील या मध्ये आता समावेश आहे.
अशीच एक बातमी हाती आली आहे. अहमदनगर शहरांमध्ये चक्क एका पुतण्याने चुलत्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्यावर ब्लेडने वार केला आहे. ही घटना बोलेगाव उपनगरातील गांधीनगर परिसरातील आहे. आणि ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे. यामध्ये जो आरोपी आहे त्याचे नाव चैतन्य महादेव आडागळे असे असून, परशुराम मारुती आडागळे वय 39 असे जखमी झालेल्या चुलत्याचे नाव आहे. आरोपी चैतन्य विरोधामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी कामावरून घरी येत होते घरी येत असताना त्यांना त्यांचा पुतण्या गांधीनगर येथील श्रीनाथ किराणा दुकानासमोर उभा असलेला दिसला, म्हणून फिर्यादी यांनी आरोपी चैतन्यला ‘ तू येथे विनाकारण का थांबला ? येथे थांबू नको. लगेच घरी जा ‘ असे सांगितले.
दुकानासमोर चुलते आपल्याला असं का म्हणले याचा राग मनात धरून आरोपी चैतन्यने आपल्या चुलत्याला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याच्याकडील ब्लेडने त्यांच्यावर वार केल्याचे या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.