सोयगाव तालुक्यातील किन्ही येथील गायत्री माता परिवार तर्फे वृक्षरोपन सोहळा.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव : गायत्री माता परिवार यांच्या दरसाल प्रमाणे यावर्षी देखील सोयगाव तालुक्यातील किन्ही येथील गायत्री माता परिवार तर्फे भव्य वृक्षरोपन सोहळा मध्ये असंख्य विविध झाडाची रोपे लावण्यात आली, वृक्ष गंगा अभियान व इंडियन आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने खुलताबाद येथे भव्य महावृक्षारोपन सोहळा पार पडला,सोयगाव तालुक्यातील गायत्री माता परिवार चे समन्वयक सकाहरी वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली किन्ही येथील युवक-युवती तथा स्री पुरूष यांनी या सोहळ्यात चांगला प्रतिसाद दिला यावेळी इंडियन आर्मीचे 80 जवान व गायत्री माता परिवार चे सदस्य यांनी एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करत तो पूर्ण केला,या विषेश कार्यक्रमात स्वप्नपूर्ती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समाधान शिंदे पाटील व त्याचे सहकारी यांनी सामाजिक भावनेची जाण ठेवत झाडे लावण्यात मदत केली,यावेळी उपस्थित असलेले सकाहरी वाडेकर,ममता वाडेकर,सांडू मानके,संगिताताई पाटील,आशाताई मुळे,शिवाजी मुळे,समाधान भुमे,शिवाजी पाटील,संदीप जाधव,दिपक राऊतराय,सुरज सपकाळ आदी.सदस्य तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…