नगर वार्ता : सावधान ! जर मुळा डॅमला जाणार असाल; तर….

पावसाळा म्हटलं की प्रत्येकाला वेड लागतं ते निसर्ग रम्य ठिकाणी भटकंती करण्याचं. आणि अनेकदा पाण्याच्या ठिकाणी अनेक पर्यटक जात असतात. आपल्या कॅमेरा मध्ये हे निसर्गरम्य दृश्य कैद करण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात. निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालण्यासाठी कधी कुटुंब मित्रमंडळी मैत्रिणी ग्रुपने फिरण्यासाठी जातात. काही महत्त्वाच्या ठिकाणी प्रशासन पर्यटकांना येण्यासाठी मज्जाव करतो. मात्र बऱ्याचदा प्रशासनाला हुलकावणी देत बेभान असणारे पर्यटक त्या ठिकाणी पोहोचतातच. आणि अघटीत असं काही घडतं. सेल्फीच्या नादात बुडालेले अनेक जणांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.
अशाच प्रकारचा एक धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यातही घडला आहे. अहमदनगर शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणारा महत्त्वाचा तलाव मुळा डॅम या तलावात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलीय. मृत्युमुखी पडलेले नेमके कोण होते त्या ठिकाणी का गेले याबद्दलची जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील धरणावर निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी गर्दी केली मात्र त्यांच्या या आनंदावर पडली विर्जन पडले दुपारच्या वेळी धरणाच्या पाण्यामध्ये नगर शहरातील एक पर्यटक उतरला होता आणि तो त्या धरणाच्या पाण्यात बुडाला स्थानिकांच्या मदतीने त्या पर्यटकाचा सायंकाळी साडेपाच च्या सुमारास मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला चेतन कैलास क्षीरसागर ( वय 38 श्रमिक नगर, पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक, सावेडी, अहमदनगर ) असे आहे.
मृत चेतन समवेत त्याचे मित्र बाळकृष्ण धारुणकर,सोमनाथ देवकर, बाळासाहेब शिंदे,संतोष मेहत्रे, निलेश धारुणकर, बाळासाहेब जुंदरे,संदीप शिंदे,आशुतोष भागवत,राजेंद्र करपे,योगेश पतले,नितीन फल्ले,मिलिंद क्षिरसागर (सर्वजण रा.अहमदनगर) असा १३ जणांचा ग्रुप धरणावर पर्यटनासाठी आला होता.