नगर वार्ता : कोपरगाव येथील शेतकऱ्याची फाशी घेऊन आत्महत्या.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि अश्या कृषिप्रधान देशात्मध्ये शेतकरी आत्महत्या नवीन नाही आहे. त्याचे कारण आहे ते म्हणजे या देशातील राजकरण आणि इथले भ्रष्टाचार. अक्षर दुष्काळाच्या झळा सोसून बळीराजा बऱ्याचदा आत्महत्या करतो. मात्र भर पावसाळ्यातही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. कधीकधी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा दाखल झाला आणि त्यामुळेच नगर तालुक्यातील एका शेतकऱ्यांना गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
अशीच एक घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या दिलीप दिनकर निकम ( वय 50 ) यांनी आपल्या राहत्या घरासमोर सकाळी सहाच्या दरम्यान कांद्याच्या चाळीत लोखंडी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या इसमाच्या मयताच्या भावाने ( मोतीराम निकम वय 35 ) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या बातमीने सुरेगाव मध्ये सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मयत निकम यांच्या घरामध्ये जमिनीच्या कारणावरून बऱ्याच वर्षापासून अंतर्गत वाद चालू होते. आणि या वादामुळे शेती पडीक पडली होती. शेती पडीक असल्यामुळेजे शेतीतून मिळणारा उत्पन्नाचा सोर्स होता तो बंद झाला. आणि त्यामुळे मोठ्या अडचणी येऊ लागल्या. त्यातच मुला मुलीचे विवाह जमवण्यात अडचणी येत होत्या. आणि यामुळे ते मयत निकम हे तणावाखाली जगत होते. त्यातच मयत निकम हे वडिलांपासून अविभक्त राहत होते. आणि त्यांना उत्पन्नाची साधन नसल्याने ते कायम तणावात राहत होते. आणि अखेर निकम यांनी निराश होऊन हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. त्यातूनही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचप्रमाणे पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चव्हाण हे करत आहेत. घरामध्ये चालू असलेल्या वादविवादामुळे निकम यांना अखेर आत्महत्या हा पर्याय निवडावा लागला. आणि निकम कुटुंबियांनी त्यांच्या घरातील कर्ताकरविता माणसाला गमावले.