साडेतीन लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट, सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली माहिती.

विजय चौधरी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यात वृक्ष लागवडीसाठी वन महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला असून या महोत्सवाला तालुक्यात तीन लक्ष ३९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे मिळाले आहे अशी माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली आहे

सोयगाव तालुक्यातीसाठी वृक्षलागवडीसाठी वृक्ष लागवड उपक्रमासाठी तालुकास्तरीय उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.त्यानुसार यंत्रणांना वृक्ष लागवडीबाबत सूचना देण्यात आलेल्या असून जरंडी ग्रामपंचायतिने उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाचा सहभाग नोंदविला आहे.

तालुक्यात ५५ हेक्टर गट लागवड योजनेत ६१ हजार १०५ वृक्षांची लागवड करण्यात येणार असून सामाजिक वनीकरण विभागाकडून ३८ किलोमीटर रस्ता दुतर्फा लागवड करण्यात येणार आहे.सामाजिक वनीकरण विभागाला १ लाख ३२ हजार वृक्ष लागवडीचे ८३ हेक्टरवर उद्दिष्टे देण्यात आलेले असल्याचे सोयगाव वनविभागाचे लागवड अधिकारी श्रीमती नीता फुले यांनी सांगितले.