नगर ब्रेकिंग : नगर शिवसेनेत पडली फुट, या नगरसेवकांची झाली शिंदे भेट…

महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे याचे पडसाद आता नगरचा राजकारणावरही पडताहेत. अहमदनगर शहरांमध्ये कैलास वासी अनिल राठोड ही शिवसेनेची धुरा थांबा सांभाळत होते त्यांच्या पश्च्यात शिवसेना पोरकी झाल्यासारखी होती. आणि त्यानंतर आत्ताची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेला कुठलाही भवितव्य दिसत नाही. कारण त्या शिवसेनेचे बंडखोर आमदार बाहेर पडत शिंदे गट तयार केला. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट या शिवसेनेची हे दोन भाग झाले आहेत. मात्र शिवसैनिक पदाधिकारी तळागाळातील कार्यकर्ते हे नेमकी कोणत्या गटात जातात किंवा त्यांचा कुठला गट आहे हा संभ्रम अप्रत्यक्ष शिवसैनिकांमध्ये आहे.
त्यातून अनेक अनुचित प्रकार घडतात. अगदी कल्याण सारख्या ठिकाणी शिवसेनेचा पदाधिकाऱ्याला मारहाण करणं हा प्रकार देखील घडला. याच तुटीच्या राजकारणाचे पडसाद नगर शहरात पडू लागलेत. कालपर्यंत नगर शहरात शिवसेनेत कुठलीही फूट नाही असं बोललं जात होतं, त्याच शिवसेनेमध्ये आता मोठी दरार पाहायला मिळत आहे. अहमदनगर महापालिकेतील माजी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, सुभाष लोंढे काका शेळके सचिन राऊत आदी नगरसेवक आणि पदाधिकाऱयांनी आज मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गुरु पोर्णिमेला नगरसेवक अनिल शिंदे तसेच माजी नगरसेवक सचिन जाधव आणि लोखंडे हे भेटण्यासाठी गेले होते मात्र आज त्यांच्यासोबत सुभाष लोंढे आणि काका शेळके यांची वाढ झाली अशी चर्चा आता शहरात रंगू लागल्या.
पुढच्या काळामध्ये नगर शहरात आणि शिवसेनेत काय घडणार आहे याकडे लक्ष आहे. मात्र जे शिवसेना मध्ये फुट पडत आहे हीच फूट आता नगर शहरात पाहायला मिळत आहे. आधीची शिवसेना कशी असेल आणि बंडखोरी नंतर आता शिवसेना कशी उभा राहील याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे