माझं गाव

जरंडी गावासाठी भरीव निधी मिळवून देईल ! डॉ.निलेश गटणे. ग्रामस्थांची धडपड पाहून चक्क मु का अधिकारी भारावले.

विजय चौधरी -सोयगाव तालुका प्रतिनिधी

सोयगाव,दि.२१…जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या जरंडी गावातील ग्रामस्थांची धडपड पाहून आणि ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या कल्पकतेतील हे विविध उपक्रम पाहून मी भारावलो आहे.त्यामुळे विकासाच्या मदतीत मी जरंडी गावाच्या पाठीशीच आहे जिल्ह्यात जरंडी ग्राम पंचायतीला विशेष आणि भरीव मदत देवून जरंडीकरांचे हात बळकट करेल असे आश्वासन बुधवारी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गटणे यांनी जरंडीला विविध उपक्रम उद्घाटन आणि वृक्षारोपण मोहिमेसाठी आल्यावर केले.

जरंडी ग्राम पंचायतीने गावात विविध उपक्रम राबवून वृक्ष रोपण कार्यक्रमात तालुक्यात अव्वल भरारी घेतली आहे.गावाच्या विशेष वृक्षारोपण मोहिमेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.निलेस्ग गटणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी त्यांनी गावाला विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले.ग्रामसेवक सुनील मंगरुळे आणि सरपंच वंदनाबाई पाटील यांच्या कल्पकतेतून गावात विविध उपक्रम राबविण्यात आले यामध्ये वृद्धांसाठी जेष्ठ नागरिक कक्ष स्थापना,गावाच्या सुरक्षेसाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे,तसेच शंभर टक्के कर भरणा केलेल्यांसाठी मोफत दळण साठी पीठ गिरणी थंड आणि गरम पाणी याच सोबत तालुक्यात सर्वाधिक वृक्षारोपण करण्याचा संकल्प आदी उपक्रम राबविण्यात आले या उपक्रम उद्घाटनासाठी बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ,निलेश गटणे यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

ग्रामपंचायत जरंडी येथे ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्री बालाजी मंदिर येथे महिला बचत गटाच्या ग्राम संघातील महिला, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले त्यामध्ये हर घर तिरंगा ध्वज दिनांक १३ ऑगस्ट 2022 ते १५ ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येक घरावर उभारणे व ध्वज संहितेचे पालन करणे,लोकसंख्येच्या तीन पट वृक्षारोपण करणे व त्याचे संवर्धन करणे,प्रत्येक व्यक्तीचे covid-19 चे लसीकरण करणे व प्रत्येकाला वैश्विक महामारी मधून सुरक्षित करणे,जल जीवन मिशन योजना गावात प्रभावीपणे राबविणे त्या प्रत्येक कुटुंबाला कार्यरत नळजोडणी देऊन प्रति माणसी 55 लिटर शाश्वत,शुद्ध व पुरेसे पाणीपुरवठा करणे,स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्‍तीक शौचालय बांधकाम करणे व त्याचा वापर करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे व्यवस्थापन करणे, प्लास्टिक कचरा वेगळा करून त्याचे व्यवस्थापन करणे, प्लास्टिक बंदी करणे ,कमीत कमी प्लास्टिकचा उपयोग करणे ,त्यासाठी खड्डे करणे ,कंपोस्टिंग करणे, सांडपाण्याचे नियोजन करणे यामध्ये वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावर गावाच्या भौगोलिक स्थितीनुसार सार्वजनिक स्तरावर पाझर खड्डे किंवा स्थिरीकरण तळे करणे, गावातील उकिरडे साफ करणे त्याचे नियोजन करणे, गावात गोबर्धन योजना राबविणे त्यातून वीजनिर्मिती करणे खत तयार करणे, गाव मॉडेल घोषित करणे, इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले

ग्रामपंचायत जरंडी मार्फत विविध उपक्रम राबवून निलेश गटणे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यामध्ये गावातील वृद्धांसाठी थोडेसे मायबाप कक्ष स्थापन करून त्याचे लोकार्पण करण्यात आले त्याचबरोबर वृद्ध व्यक्तींना प्रातिनिधीक स्वरुपात छत्री व काठ्यांचे वाटप करण्यात आले. अल्पदरात शुद्ध आरो प्लांट चे पाणी गावकऱ्यांसाठी लोकार्पण करण्यात आले,ग्रामपंचायत चालू वर्षातील पाणीपट्टी व घरपट्टी 100% भरणा करणाऱ्या कुटुंबास मोफत वर्षभर दळण देण्याकरिता पिठाची गिरणी चे लोकार्पण करण्यात आले.ग्रामपंचायत मार्फत बचत गटांना कक्ष उपलब्ध करून देण्यात आला त्याचे सुद्धा लोकार्पण करण्यात आले.दिव्यांग कक्ष याचीदेखील लोकार्पण करण्यात आले.सदर कार्यक्रमा प्रसंगी प्रकाश नाईक गटविकास अधिकारी पंचायत समिती सोयगाव, रमेश शिंदे उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा,प्रकल्प अधिकारी दीपक म्हेत्रे ,गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे,सामाजिक वनीकरण अधिकारी नीता फुले,ग्रामपंचायतीचे सरपंच वंदनाबाई पाटील,उपसरपंच संजय पाटील,मधुकर पाटील,मधुकर सोनवणे,दिलीप पाटील,माजी पंचायत सदस्य संजीवन सोनवणे,प्रकाश पवार, लोकप्रतिनिधी,ग्रामसेवक सुनील मंगरुळे,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी संतोषकुमार पाटील,सतीश बावस्कर, सुनील राकडे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी ,कर्मचारी सर्व ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!