सोयगाव पोलीस स्टेशनचे तात्कालीन सपोनि.सुदाम शिरसाट स. पो. उपनिरीक्षक पंडित व पोलीस कर्मचारी सरताडे, बरडे यांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान.

सोयगाव,दि.२१ जुलै-
सोयगाव पोलीस स्टेशनचे तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट,पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित,पो.ना.ज्ञानेश्वर सरताळे,पो.ना.राजू बरडे, यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल गौरवपत्र प्रदान करण्यात आले.

हा पुरस्कार औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सोयगाव पोलीस स्टेशन येथील गुरन.८१/२२ कलम-४५४,३८०, या गुन्ह्याचा तपास तात्कालीन सपोनि. सुदाम शिरसाट,पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित,ज्ञानेश्वर सरताळे,राजू बरडे,यांनी तपास करून अज्ञात आरोपीचा शोध घेऊन दोन आरोपी यांना अटक करून १०.७५०,ग्राम सोने,व २००००₹ रोख, हस्तगत केला.

या घटनेचा तपास बारकाईने तपास करून सदर आरोपीस न्यायालयात हजर केले होते.या कामगिरीबद्दल त्यांना पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण मनीष कलवानिया यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.

तसेच भविष्यातही अशाच उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.
