संत ज्ञानेश्वर महाविद्यालयीन कर्मचारी पतसंस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयीन कर्मचारी वि.वि. सहकारी पतसंस्था मर्यादित, सोयगांव यांची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 22 जुलै 2022 शुक्रवार रोजी संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार हे होते. या सभेची सुरुवात सर्व प्रमुख पाहुण्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून करण्यात आली. या पतसंस्थेचे सचिव डॉ. छत्रगुण भोरे यांनी अहवाल वाचन करून तेरीज पत्रक नफा-तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक, अंदाज पत्रक मंजुरी, नवीन अंकेक्षकाची नेमणूक व इतर सर्व खर्चास मंजुरी अशा विविध विषयावर खेळीमेळीच्या वातावरणात सभागृहात चर्चा करण्यात आली व सर्व सभासदांनी विषयांना मंजुरी दिली. पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार यांनी अध्यक्षीय समारोप करताना मागील पाच वर्षापासून केलेल्या कामकाजाचा आढावा व नफा वाटप, लाभांश वाटपाबाबत, व पतसंस्थेची हित जोपासण्याबाबत सर्व सभासदांना आवाहन केले तसेच सर्वांच्या समस्यांचे समाधान केले. सभा यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री उदयभान सोनवणे यांनी परिश्रम घेतले या सभेकरिता सर्व संचालक मंडळ व पतसंस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते