नगर ब्रेकिंग : बेलापूर रोडला भीषण अपघातात टँकरखाली चिरडून बाप-लेकीचा मृत्यू, मुलगा जिल्हा रुग्णालयात..

अत्यंत भयानक असा अपघात झाला आहे. हा अपघात श्रीरामपूर शहरातील बेलापूर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज वेशीजवळ झाला. श्रीकृष्ण देवळासमोर सकाळी पावणे दहाच्या सुमारास टँकर खाली येऊन बापलेकीचा दुर्दैवी अंत झाला आहे. टँकरने या दोघांचा जीव घेतला मोटर सायकल वरून बाळासाहेब गायकवाड आणि त्यांची मुलगी या दोघांचा टँकर खाली चिरडून दुर्दैवी अंत झाला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी आहे कि, श्रीरामपूर कडून बेलापूरकडे जात असलेला उसाच्या मळीने लोडेड टँकर खाली बेलापूर कडून श्रीरामपूर कडे येणारी मोटर सायकल बजाज सिटी हंड्रेड गाडी चाकाखाली आली, त्यामुळे मोटरसायकलवर मागे बसलेल्या तरुणीचा टँकरच्या चाकाखाली येऊन चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
टँकरने जवळपास शंभर फूट त्या तरुणीला फरपटत नेलं. या घटनेनंतर टँकर चालक फरार झाला होता, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव दिपाली बाळासाहेब गायकवाड वय 20, वडिलांचे नाव बाळासाहेब गायकवाड वय 50 यातील जखमी बाळासाहेब गायकवाड यांचा मुलगा अजित गायकवाड याला पुढील उपचारसाठी नगर येथे हलवण्यात आले आहे,
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे हवालदार लाला पटेल, राहुल नरवडे यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह साखर कारखाना रुग्णालयात पोहोचवला.