सोयगाव परिसरात पावूस, निंदनी व खुरपणीच्या कामांना दुपारीच ब्रेक….

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव,दि.२३…सोयगावसह परिसरात शनिवारी दुपारी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे हाती घेतलेले निंदनी आणि खुरपणीचं कामांना वाफश्या अभावी ब्रेक लागला होता त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.सोयगाव परिसरात नुकत्याच झालेल्या सततच्या रिमझिम पावसामुळे खरिपाच्या पिकांमध्ये तनाने डोकेवर काढले आहे.त्यामुळे तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु असून शनिवारी मात्र झालेल्या पावसाने दुपारीच पुन्हा धावपळ उडवून दिली.
सोयगाव भागात अचानक दुपारी पावूस झाला काही भागात पावसाचा जोर अधिक तर काही भागात कमी होता परंतु झालेल्या पावसामुळे शेतीचा वाफसा असंतुलित झाल्याने निंदनी आणि खुरपणीच्या कामांना अचानक ब्रेक लागला पावूस सुरु झाल्याने मजुरांना दुपारीच घरी जावे लागले होते…
सोयगाव परिसरात आधीच तण व्यवस्थापनासाठी मजूर मिळत नसल्याने सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मजुरांची टंचाई असतांना शनिवारी झालेल्या पावसाने तन व्यवस्थापनाच्या कामात अडथळा घातला होता.त्यामुळे मिळालेल्या मजुरांनी घराचा रस्ता धरला होता.