नगर ब्रेकिंग : विजेच्या झटक्याने नवरा बायको दोघांचाही मृत्यू..

शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ रोडवर कांबळे वस्तीनजीक शेतात काम करणाऱ्या पती-पत्नीचा मृत्यू झाला. हे दोघे हि शेतात काम करण्यासाठी गेले होते. या दोघांची नावे जालिंदर कांबळे आणि नीता कांबळे असून या दोघांचा लाईटच्या तारांना चिटकून मृत्यू झाल्याची बातमी समोर येते.
दोघे नवरा बायको आपल्या शेतामध्ये पिकांमधील गवत यंत्राच्या साह्याने काढण्याचे काम करत होते तिथे पसरलेल्या शेजारील विजेच्या गवत काढण्याच्या यंत्राच्या पात्याने विद्युत प्रवाह चालू झालेला केबलला कापलं त्यानंतर मशीनला गुंडाळलं आणि त्यामुळे जालिंदर कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.
ते पाहिल्यानंतर त्यांची पत्नी नीता या धावून गेल्या आणि त्यांचा देखील विजेला चिटकून जागीच मृत्यू झाला. त्यांना छोटीशी मुलगी आहे असं देखील समजते घटनास्थळी तात्काळ पोलीस हजर झाले या घटनेचा पंचनामा करण्यात आला. मात्र यामध्ये या पती-पत्नीला कोणीही वाचू शकले नाही. कारण की विद्युत प्रवाह सुरू असणाऱ्या विजेचा शॉक त्यांना बसला होता आणि त्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला.