नगर : संगमनेर तालुक्यातील घटना, एका कार चालकाच्या चुकीमुळे नऊ जण जखमी.

कार चालकाने पुलावरती चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केला, त्यामुळे भयानक प्रकार घडला. शिवशाही बसच्या चालकाला ब्रेक दाबावा लागला या बसला पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पो धडकला आणि अपघातात टेम्पो चालक, क्लीनर आणि शिवशाही बस चालक, बसमधील सहा प्रवासी असे एकूण नऊ जण जखमी झाले.
शनिवारी रात्री आठच्या सुमारास पुणे नाशिक बाह्य वळणावरती नाशिक – पुणे बाह्य वळण महामार्गावर म्हाळुंगी नदीच्या पुलावरती हा भीषण अपघात झाला. शुभम वाबळे आयशर ट्रक चालक वय 24 स्वप्निल शेळके क्लीनर 34 दोघेही राहणार पाबळ शिरूर. अनिकेत सहाने शिवशाही बसचालक राहणार संगमनेर नीलिमा कसबे बसमधील प्रवासी त्यांची प्रकृती स्थिर आहे. यांना उपचारासाठी संगमनेर मध्ये दाखल केले तर किरकोळ जखमी झालेल्याची नावे समजू शकले नाहीयेत.
वाबळे, शेळके व कचवे यांना उपचारासाठी संगमनेर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. किरकोळ जखमी असलेल्यांचे नावे समजू शकली नाही. पुण्याहून नाशिकला जात असलेल्या दोन्ही वाहनांचा अपघात झाला आहे. शिवशाही चालक सहाने हे संगमनेर मधील असल्याने लगेच संपर्क करून जखमींना तात्काळ मदत मिळू शकली. छाती व पायाला मार लागला असतानाही त्यांनी जखमींना उपचार मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
अपघात झाल्याचे पाहून चुकीच्या पद्धतीने पुलावर ओव्हरटेक करणारा कार चालक पळून गेला. पण अपघाताची माहिती मिळतात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेतले आणि वाहतूक सुरळीत करून दिली.