नगर ब्रेकिंग – आता अहमदनगर शहराचं ही नाव बदलणार ?

काही दिवसापूर्वी औरंगाबादचे संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे धाराशिव असा नावात बदल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये अगदी शेवटच्या दिवशीच झालं.
मात्र आता अजून एका शहराचे नाव बदलाबाबत पुढे येत आहे आणि ते म्हणजे अहमदनगरच्या नाव बदलाचे विषय पुन्हा एकदा ऐरणी वरती आला.
अहमदनगरच्या नाव बदलाचे अनेकदा प्रस्ताव आले. अहमदनगर नाव काय ठेवायचं हे देखील पुढे आलं, मात्र अजूनही त्यावरती कुठलाही शिक्कामोर्तब झाला नाहीये. अहमदनगरला चौंडी या ठिकाणी अहिल्यादेवी यांचे माहेर आहे. त्या माहेराच्या अनुषंगाने अहमदनगरचे नाव अहिल्याबाई होळकर यांची नावाने द्यावं अशी मागणी केली जाते.
याबाबत वांद्रे येथील रंग शारदा सभागृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धनगर मेळावा आणि सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या त्याचे प्रश्न मार्गी लागणार धनगर समाजाला अनुसूचित जाती समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असला तरी, राज्य शासन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी दिला. तर अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक व्हावं अशी इच्छा आहे असेही त्यांनी म्हटलं.
अहमदनगरला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची बाब तपासून पहिले जाईल तसेच आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर ते गुन्हे दाखल झाले आहे ते मागे घेतले जातील. आत्मदहन करणाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये देऊ आणि त्यांना नोकरी देण्याबाबतही निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे आता नवीन मुख्यमंत्र्यांच्या या नवा सरकारमध्ये अहमदनगरच बारसं होतं की काय हे पाहणं फार महत्त्वाचं असेल.