तिच्या तळहातावर लिहील होत, ”मी बेवफा नाहीये आई-बाबा मला…” पुढे पाहा काय झाल !

आत्महत्येच्या अनेक घटना घडत असतात. दररोज कुठे ना कुठे आत्महत्या केली जाते, आत्महत्या करण्याचे अनेक कारणे असू शकतात. कधी दबाव असतो, कधी त्रास असतो, कधी आजारपण असतं या सगळ्या गोष्टींमुळे अनेक जण निराशातून आत्महत्या करतात. आत्महत्या करण्यापूर्वी चुकीच लिहिणं किंवा एसएमएस द्वारे आत्महत्याच कारण सांगण असे प्रकार होतात. मध्यप्रदेश मध्ये पहिल्यांदाच असं घडलं. थेट हातावरतीच सुसाईड नोट लिहिण्यात आली, हातावर लिहिण्यात आलं होतं ‘ मी बेवफा नाही…’
पाहुयात बातमी सविस्तर मृताच्या हातावरती सुसाईड नोट लिहिली आहे ज्यामध्ये स्वैच्छणे जीव देत असल्यास देखील या नमूद केल आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपळा आहे या ठिकाणी महिला शिक्षिकेचा मृतदेह सासरच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सुनेने आत्महत्या केल्याचं सासरच्या लोकांनी पोलिसांना कळवलं,पण मृत महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
इंदू यांचा विवाह भोपाळ मधील सुभाष शाहू यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला इंदू सरकारी शाळेत शिक्षिका होत्या, सुभाष यांनी पत्नीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेह खाली उतरवला आणि तो तपासणी साठी पाठवला. पोलिसांना मृतदेहाच्या जवळ पतीचा फोटो सापडला आणि हातावर हे लिहील होत, ” मी बेवफा नाही, आई-बाबा, भाऊ मला माफ करा. माझ्या मंगळाने माझा जीव घेतला.
पोलिसांना ही दोन्ही हस्तलेख तपासून पाहत आहेत. महिलेच्या पतीने सांगितलं की, तिने गळफास लावून घेतला तर नातेवाईकांच्या म्हणणं आहे की, त्यांच्या मुलीचे गळफास घेतला नाही तर तिची हत्या झालीये. जावई आपल्या मुलीचा छळ करत होते, संशय घेत होते त्यामुळे या दोघांमध्ये वाद व्हायचे. हा वाद विकोपाला पोहोचला अन अशा पद्धतीने हे दुर्दैवी घटना घडली. पण अपघाताच्या अगदी काही तासापूर्वीच मुलगी फोनवर बोलली होती तिने सगळं नॉर्मल असल्याचे देखील सांगितलं होतं मात्र काही तासानंतर तिच्या मृत्यूची बातमी पुढे आली.