ब्रेकिंग : आता प्लास्टिक सोबत ” या वस्तूंवर ” देखील बंदी. राज्य सरकारचा निर्णय.

काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने प्लास्टिक वर बंदी आणली होती. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील महाराष्ट्र मध्ये एक प्लास्टिक संदर्भात निर्णय घेतला आहे. आणि त्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील दिले आहेत.
महाराष्ट्रामध्ये सिंगल युज प्लास्टिक बंदी केली आहे. सिंगल न्यूज प्लास्टिक बंदी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या सिंगल प्लास्टिक मध्ये प्लेट्स, वाडगा, चमची, कंटेनर इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. आणि महाराष्ट्र सरकारने या सगळ्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती, पण त्यावेळी बाजारामध्ये पेपरच्या नावाखाली डिश, कंटेनर, ग्लास, कप, आदि प्लास्टिक लेप असलेल्या किंवा प्लास्टिक लॅमिनेशन केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये आल्या.
त्यातून असे लक्षात आले की, या सगळ्या वस्तूंमध्ये देखील प्लास्टिक आहे आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्लॅस्टिक कोटिंग किंवा लॅमिनेशन असलेल्या वस्तूंवरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. प्लास्टिक वापरामुळे ज्या निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या आहेत त्या लक्षात घेऊन राज्य सरकारने प्लास्टिक बंदी नियमांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. आणि या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणीसाठी शक्तीप्रदत्त समिती देखील नेमण्यात आली आहे.
या समितीची ७ जुलैला बैठक झाली. त्यात महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल उत्पादने अधीसूचना 2018 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. महाराष्ट्र सरकारने 15 जुलैच्या अधिसूचनेद्वारे प्लास्टिकचा लेप किंवा प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर देखील बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डिस्पोजेल डिश, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर आदींच्या उत्पादनावर आता बंदी लागणार आहे.
तसे विचार केला असता शहरी व ग्रामीण भागामध्ये कचऱ्यातील प्लास्टिकचे जे प्रमाण आहे ते भरपूर प्रमाणात आहे. कचरा डेपो, जलाशयामध्ये हा कचरा फेकला जातो. आणि या कचऱ्याची पुनर्प्रक्रिया शक्य नसल्याने रात्रीच्या वेळी जाळला जातो. आणि या जाळण्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण देखील होतं. त्यामुळे हे रोखण्यासाठी म्हणून शिंदे सरकारने असा निर्णय घेतला आहे.