एकादशीच्या मुहूर्तावरती मरण यावं यासाठी 80 वर्षी आजीबाईंना पहा काय पराक्रम केला…

अध्यात्माची गोडी इतकी नसावी की, आपण देवाकडे एकादशीच्या दिवशी आपल्याला मरण मागावं. या आजीबाईंनी यासाठी अनोखाच प्रताप केला.
एकीकडे आजीबाई आजारपणाला कंटाळलेल्या होत्या आणि दुसरीकडे आपलं मरण एकादशीच्या दिवशी यावं असेही त्यांना वाटत होतं. म्हणूनच औरंगाबाद येथील शिवाजीनगरला राहणाऱ्या एका आजीबाईंन एकादशीच्या दिवशी मुहूर्त पहात अंगाला गावरान तूप लावून पेटून घेऊन आत्महत्या केली. या अध्यात्माची प्रचंड गोडी असलेल्या 80 वर्षाच्या वृद्ध महिलेने आजारपणाला कंटाळून हे पाऊल उचललं.
कावेरी भास्कर भोसले वय वर्ष 80 असं आत्महत्या करणाऱ्या आजीबाईंचे नाव आहे. कावेरी भोसले यांना अध्यात्माची गोडी होती. त्यांचा मुलगा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीला होता. कावेरी यांना हृदयाचा त्रास होता. त्याशिवाय दम्यासारखाही आजार होता. दिवसभर हरिपाठ, भजन, पारायण, पोथीचे भाषण करणे यातच त्या आजी रमून असायचा. रविवारी नियमितपणे परिपाठ केला भजन म्हटल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर रूममध्ये झोपण्यासाठी दहा वाजता गेल्या. त्यानंतर त्यांनी अंगाला तूप लावून बाथरूम मध्ये जात देवाचा धावा करत स्वतःला पेटवून घेतलं. त्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर मुलगा आणि सुनेने वरच्या मजल्यावर धाव घेतली. त्यांना तात्काळ घाटी रुग्णाला दाखल केला त्या ठिकाणी उपचार सुरू असताना सकाळी दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
कावेरीयांनी कुटुंबातील सदस्याना अनेक वेळा एकादशीला मृत्यू यावा अशी भावना बोलून दाखवली होती. तसेच त्यांना असलेल्या आजारामुळे आत्महत्याचा मार्ग पत्करला असावा असं कुटुंबीयांनी सांगितल. कुंडलिक नगर पोलिसांनी याबद्दलचा अधिक तपास सुरू केला या घटनेचे तपास पोलीस नाईक बापूराव पांढरे हे करतात. मात्र अध्यात्माच्या गोडीन आणि आजारपणाला कंटाळून आजीबाईंना इतका टोकाचे पाऊल उचलणं हे चुकीचं असल्याचं मत जनसामान्य व्यक्त करत आहेत.