नगर ब्रेकिंग : शेवगाव येथील लिपिकाला ” हे ” करताना रंगेहात पकडले.

अहमदनगर जिल्ह्यात भ्रष्टाचारानं काही काळ विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या गोष्टी घडायला सुरुवात झाली.
पन्नास हजारांची लाच स्वीकारताना त्या अधिकाऱ्याला पकडण्यात आले ही बातमी आहे. शेवगाव येथील तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागातील एका लिपिकाला 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. गाड्या सोडण्याची हि लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. नाशिक लाच प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.
तालुक्यातील वाळू व्यवसायात मोठ्या प्रमाणात तरुण उतरले आहेत आणि त्यातच अशा पद्धतीने मोठा काळाबाजार चालतोय. त्यातील अनेकांचे यंत्रनेशी अर्थपूर्ण असे संबंध आहेत, तर काही तक्रारी दाखल केल्या आहेत एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तर पन्नास रुपये देणार अस ठरला युवकाने त्याला पकडून देण्याचा निर्धार करून नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार सापळा रचून ठरल्याप्रमाणे रकमेपैकी 50 हजार रुपये लाच घेताना तहसीलदार कार्यालयाच्या आवारात लिपिकाला पकडण्यात आले आहे. मात्र एवढी मोठी रक्कम लिपिक स्वतःसाठी घेत होता का की आणखी काय आहे यावर आता तपास सुरू आहे आणि त्यामुळे अशा वेगवेगळ्या चर्चांना आता उद्या येऊ लागल्या