गाव वाचल !! पण, त्यासाठी त्या दोघांनी उचलले ” हे ” पाऊल.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अख्ख्या गावाचे प्राण वाचवणार्या त्या पायलटला मानाचा सलाम !
आग लागलेल्या लढाऊ विमानात विंग कमांडर मोहित राणा आणि अद्वितीय बल शहीद झाले. त्या दोघांनी विमानाला आग लागल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत सतर्कता दाखवत शेकडो जणांचे प्राण वाचवले. मोहित राणा आणि अद्वितीय बल रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी यांनी विमानातून उड्डाण केलं होतं. मात्र काही मिनिटातच भीषण आग लागली त्यावेळी विमान भीमडा गावाच्या वर होतं, गावाची लोकसंख्या सुमारे २५०० एवढी होती. पण त्यांच्याकडे अश्या परिस्थिती मध्ये दोनच पर्याय होते लगेच गावावर विमान क्रश करण मात्र तसे त्यांनी तसे केले नाही, शेकडो जणांचे प्राण धोक्यात आले असते, दुसरा म्हणजे स्वतःच्या जिवाचा विचार न करता विमान दूर नेहून क्रश करणं.
अश्या वेळेस त्यानी दुसरा पर्याय निवडला त्यांनी ते विमाने गावापासून दोन किलोमीटर अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी नेल. एका टेकडीवरती हे विमान क्रॅश केल. गावातील शेकडो लोकांचे प्राण वाचवताना आपल्या प्राणांची मात्र या वीरांना आहुती द्यावी लागली.
यात विंग कमांडर मोहित राणा हे मुळचे हिमाचल प्रदेश मधील होते. व अद्वितीय बल जम्मू काश्मीर येथील रहिवासी होते. विमानाला हवेतच आग लागल्यानंतर गावावरून दोन ते तीन घिरट्या घातल्या, लोकांचा अंदाज आल्यामुळेच त्यांनी विमान उतरवण्यासाठी सुरक्षित जागी शोधली. काही अंतर जाऊन हे विमान क्रश केल. सुदैवाने गाव वाचाल त्यांच्या कामगिरीमुळे अनेकांचे प्राण वाचले खरे मात्र त्यांना शहीद व्हावे लागले.
एखादी मोठी दुर्घटना होणार असेल त्यावेळी त्या परिस्थितीचा सावधानता ओळखत त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना केल्या मोहित राणा आणि अद्वितीय बल या शूरवीरांना विन्रम अभिवादन!