धक्कादायक : पोटच्या गोळ्यासाठी आईने वार हातावर झेलला, क्षणात हाताचा पंजा बाजूला गेला.

आई आणि मुलाचं नातं हे प्रत्येकाला माहीत आहे. आई व आपल्या बाळाचं नातं हे सगळ्यांपेक्षा वेगळं असतं. आईच बाळासोबत नातं हे नाळीपासून जमलेलं असतं. आई आणि बाळाचे नातं हे जगात सगळ्यात वेगळं असतं. या दोघांच्या नात्यांमध्ये निस्वार्थी प्रेम असतं. असं म्हटलं जातं की, आईची आणि बाळाची नाळ एक असते. त्यामुळे त्यांच्या नात्याची कुठेच तोड नसते. असेच याचे एक उदाहरण आहे.
पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आईने पंढरपुरात तलवारीचा वार हातावर झेलला या तलवारीच्या हल्ल्यात महिलेचा हातच पंजा पासून वेगळा झाला आहे. पंढरपुरात ही धक्कादायक घटना समोर आलीय. अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या वादाने मोठा गदारोळ झाला. दोन कुटुंबातील दोन तरुण आमने-सामने आले होते त्यांच्यात वाद पेटला. आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी पन्नास वर्षाची महिला पुढे सरसावल्या. महिलाने आपल्या लेकरावरील वार तिच्या हातावर झेलला. या हल्ल्यात या महिलेचा हातच मनगटापासून वेगळा झाला, मात्र आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी या महिलेनं आपल्या जिवाची पर्वा केली नाही.
खर्डी गावात हा प्रकार घडला आहे. जयश्री रणदिवे या पन्नास वर्षाच्या महिला यामध्ये जखमी झाल्यात. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतलेली आहे. पोलीस आणि मुख्य हल्ला करणारा रामदास कांबळे यासह सिताराम कांबळे, सर्जेराव कांबळे इंदापूर येथील संतोष उकरंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला.आरोपीवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विशेष म्हणजे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जयश्री यांच्या हातावरती जोरदार वार केला त्यावेळी त्यांच्या हाताचा पंजा उडून गेल्याची घटना घडली आहे. या महिलेवर वार केल्याप्रकरणी त्यांना बेदम मारले. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. मात्र आपल्या लेकराला वाचवण्यासाठी आईने आपला हात हा कायमचा गहाण ठेवला आहे.