मी स्वतः आणि भाजप या वक्तव्याशी अजिबात सहमत नाही. – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब.

भाजपाकृत राज्यपाल म्हणून राज्यपाल भगतसिंह यांना संबोधलं जातं.
मात्र मुंबईबद्दल केलेल्या या वक्तव्यावरती आता भाजपा नाराज झाली आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण राज्यपालांच्या या विधानावरती सहमत नाही. अस म्हणाले आहेत. त्याच्या या वक्तव्यवर भाजपा सहमत नाही असं स्पष्ट केलं.
ते म्हणतात की राज्यपालांच्या विधानाशी मी सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं कार्य सर्वाधिक आहे. एखाद्या विशेष कार्यक्रमात आपण अतिशोयोक्ती अलंकार वापरतो त्या स्थितीतून राज्यपालांचे हे वक्तव्य आला असावं. त्याबद्दल ते स्वतः स्पष्ट करून देतील असेही फडणवीस यांनी म्हटलं.
उद्योगाच्या क्षेत्रातही मराठी माणसांना प्रगती केली आहे. जगात मराठी माणसाचं नाव आहे. विविध समाजाचे योगदान नाकारता येणार नाही. यात गुजराती, मारवाडी समाज ही असेल पण महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूसच आहे. उद्योजक, साहित्यिक आदींचा सहभाग जास्त आहे, एकूणच या बाबीला बघितलं तर मुंबईवर पहिला अधिकार, पहिला हक्क हा मराठी माणसाचा आहे. त्यामुळे हे चुकून राज्यपाल बोलून गेले असतील, मात्र याला मी स्वतः सहमत नाही असे स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.