नगर ब्रेकिंग : बँकेच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटली गोळी, आणि….

अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक सुरक्षा रक्षकांकडून चुकून गोळी सुटून अजित जोशी या ग्राहकाचा मृत्यू झाला.
श्रीरामपूर शहरातील अहमदनगर डिस्टिक सेंट्रल बँकेचे सुरक्षा रक्षक दशरथ पुजारी यांच्या कडून चुकून सुटलेल्या गोळीने अजित जोशी या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सदरील घटनेचा तपास श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप हे करत आहे.
बऱ्याचदा आपण बँकांमध्ये पाहतो की बँकेत काही अनुचित प्रकार घडू नाही यासाठी सुरक्षारक्षक नेमलेले असतात. त्यांच्याकडे मोठी रायफल असते ती रायफल या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू द्यायचा नाही म्हणून असते. मात्र याच एका सुरक्षारक्षका कडून चुकून या रायफल इथून गोळी निघाली आणि ती गोळी थेट ग्राहकाला लागली आणि यामध्ये ग्राहक अजित जोशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.