प्रेरणादायी : 39 वेळा रिजेक्ट केलं, पण 40 व्या वेळेस तो बनला गुगलमध्ये असोसिएट मॅनेजर.

कित्येक व्यक्तींना एखाद्या फिल्डमध्ये सर्वोच्च कंपनीमध्ये नोकरी मिळवणे हे त्यांचे स्वप्न असतं. बऱ्याच जणांना त्यांचेही स्वप्न अगदी पहिल्या प्रयत्नातच पूर्ण होते, तर काहींना त्यांचा ड्रीमजॉब मिळवण्यासाठी खूप वेळेस प्रयत्न करावे लागतात. बऱ्याचदा आपण पाहिले आहे की आपला ड्रीम जॉब मिळवण्यासाठी अनेक जण ४-५ नाही तर १०-१० वेळेस प्रयत्न करत असतात, पण एका व्यक्तीने त्याचा ड्रीम जॉब मिळवण्यासाठी तब्बल 40 वेळा प्रयत्न केला आहे.
या व्यक्तीने अमेरिकेतील गुगल कंपनीकडे ड्रीम जॉब मिळवण्यासाठी 39 वेळा अर्ज केले, पण त्याला प्रत्येक वेळेस फक्त अपयश मिळत गेलं. पण तरी देखील तो मागे हटला नाही त्यांनी चाळीसाव्या वेळेस अर्ज केला. आणि त्याच वेळेस त्याला नोकरी मिळाली. ज्यावेळी याने नोकरीसाठी 39 वेळा अर्ज केला होता, त्याला प्रत्येक वेळेस रिजेक्शनला सामोर जावं लागलं. बरेच जण याला वेडेपणा म्हणतील किंवा आत्मविश्वास पण त्याने मागे न हटता 40 वेळा त्याच्या ड्रीम जॉब साठी प्रयत्न केला आहे. आणि त्याने त्याचा ड्रीम जॉब मिळवला.
गुगलने त्याला असोसिएट मॅनेजरची नोकरी दिली आहे. या व्यक्तीने त्याची ही स्टोरी लिंकिंगवर टाकली आहे. त्याची ही पोस्ट सध्या भरपूर प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. यामध्ये तो लिहितो की,” वेडेपणा आणि विश्वास यांच्यामध्ये एक बारीक रेषा आहे. मी अजूनही हाच विचार करतोय की, माझ्यामध्ये यापैकी कोणती रेषा आहे ? 39 वेळा नकार आणि त्यानंतर एक होकार फायनली गुगलने माझी ऑफर्स स्वीकारली.” या व्यक्तीचे नाव आहे टायलर कोहेन. 25 ऑगस्ट 2019 रोजी त्यांनी पहिल्यांदा गुगलमध्ये अप्लाय केला होता. या पोस्टमध्ये त्याने सर्व ॲप्लीकेशन चा एक स्क्रीन शॉट शेअर केले आहे.
कोहेन कधी कधी महिन्यांमधून दोनदा गुगलकडे अर्ज करत असे, 2020 मध्ये कोरोना असतानाही त्याने गुगलमध्ये अर्ज केला होता, मात्र तो रिजेक्ट करण्यात आला. त्याने त्याच्याबद्दलची पोस्ट ही मागच्या आठवड्यामध्ये टाकली आहे. आणि त्यावर आत्तापर्यंत हजारो लोकांनी लाईक, कमेंट्स केली आहेत. त्याच्या पोस्टवर गुगलने ही कमेंट केली आहे ” कोहेन हा प्रवास कसा होता ?” या पोस्टमध्ये गेल्या तीन वर्षातील त्याचे प्रयत्न दिसत आहेत. यांची जिद्द, हट्ट आणि अगदी वेडेपणा काहीही म्हटलं तरीही 39 रिजेक्शन स्वीकारून ४० वेळेस प्रयत्न करणे आणि त्याला गुगलमध्ये नोकरी मिळणे हे नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
तुम्ही असेच प्रयत्न करून जर तुम्हाला अपयशच पदरी पडत असेल तर माघार न घेता, तुम्ही देखील सकारात्मक विचाराने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करू शकता. तुमच्या सकारात्मक विचाराने नक्कीच तुम्हाला यश मिळेल.