ब्रेकिंग : नगर शहरातील नालेगाव परिसरातील ( वारुळाचा मारुती ) डि. जे. पोलिसांकडून जप्त.

अहमदनगर शहरातील मालेगाव या ठिकाणी तोफखाना व कोतवाली पोलिसांनी डीजेवर कारवाई केली आहे तसेच यातील डीजे जप्त केला आहे
अहमदनगर शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी डीजे लावण्यात येणार होते, पण पोलीस प्रशासनाकडून डीजे लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नगर शहरांमध्ये डीजेवर बंदी असून देखील नालेगाव वरुळाचा मारुती या ठिकाणी असलेल्या डीजे वर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
यावर्षी पोलीस प्रशासनाने डीजेला परवानगी नाकारली आहे. तोफखाना व कोतवाली पोलिसांनी नालेगाव येथील एका डीजे वर कारवाई केली आहे. सदर डीजेचे साहित्य तोफखाना पोलिसांनी जप्त केले आहे.
सदरील कारवाई ही तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी तसेच कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी व आदी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून करण्यात आले आहे.