जि. प. कोरेगाव गटाला मिळणार नवा चेहरा, दुरुगावच्या सौ मनीषाताई विजय शिंदे भाजपाकडून इच्छुक.

ग्रामीण भागामध्ये अत्यंत महत्त्व असणाऱ्या निवडणुका म्हणजेच जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक होय. जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट आणि गणांमध्ये आरक्षण जाहीर होताच, इच्छुक उमेदवारांचे यादी झळकू लागते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे सावट आता संपूर्ण महाराष्ट्रावर पाहायला मिळते. यात कर्जत तालुक्यातून एक बातमी हाती येते. जिल्हा परिषद कोरेगाव गटातून दूरगावच्या रहिवासी असणाऱ्या सौ मनीषाताई विजय शिंदे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत अशी माहिती समोर येते.

एक स्त्री शिकली तर दोन कुटुंब सुशिक्षित होतात, जर आपली उमेदवारच उच्च शिक्षित असेल तर विकास निश्चित होणार. मनीषाताई यांना कामाचा चांगला अनुभव आहे त्यांचा महिलांसोबत चांगला संपर्क आहे .त्यांनी महाराष्ट् शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं. ज्ञानादिप स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात महिलांचे बचत गटच्या माध्यमातून महिला सबलीकरण करण्यास सहकार्य केल, तसेच आरोग्य विषयक माहिती देणे, शिबीर घेणे, महिलांना उद्योग बाबत मार्गदर्शन करणे, गेल्या 10 ते 12 वर्षापासून महिला व मुलीना यांना शिवणकला प्रशिक्षण च्या माध्यमातून स्वंयपूर्ण केले. आपल कुटुंब सांभाळत त्यांनी गाव आणि आसपासच्या महिलांच्या सक्षम बनवल.

इच्छुकांच्या यादीत मनीषाताईच नाव येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या, मात्र आपल्याला लोकप्रतिनिधी होऊन जर सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली तर आपण नक्की सर्वांचा विकास करू अस म्हणत त्या पुढे म्हणाल्या ” कोरेगाव गटाचा विकास करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टी कडून इच्छूक असून उमेदवारी दाखल करणार असून निवडणूक लढवणार आहे. या गटातून विजय निश्चित असून येणाऱ्या काळात गटातील सर्व गावे मी पिंजून काढणार आहे. काल माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे दुरगाव येथे आले असता दुरगाव चे ग्रामपंचायत सदस्य रवी भगत व भाजपा चे नेते माणिक जायभाय यांनी मनिषा विजय शिंदे यांच्या भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी बाबत मागणी केली असता त्यांनी तुमचा विचार करू असा शब्द दिला आहे. त्यांचा या गटात वैयक्तिक दांडगा जनसंपर्क असल्याने आपण विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान पक्ष श्रेष्ठी जे ठरवतील ते अंतिम असेलच तरी ही भाजपा युवा नेते मा रवि दादा भगत , ग्रांप सदस्य विजय क्षीरसागर, भाजप चे नेते माजी सरपंच माणिक राव जायभाय, माजी सरपंच मुबारक मोगल, युवा नेते रामकृष्ण केंदळे, ग्रा.प सदस्य राजेंद्र काका निंबाळकर आदी सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी माजी मंत्री प्रा आ श्री राम शिंदे साहेब यांच्या बरोबर उमेदवारी बाबत चर्चा केली व आमचा पाठींबा राहील अशी माहिती मिळाली.
