सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू, ऐन नागपंचमीच्या दिवशी निंबायती गावात शोककळा.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव,दि.०२….शेतातील निंदनी करून ठेवलेल्या तणाचे पुंजे फेकण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली.ऐन नागपंचमी च्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे निंबायती गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कपाशीच्या शेतात निंदनी करून ठेवलेल्या तणाचे पुंजे फेकण्यासाठी सोमवारी पहाटे शेतात गेलेल्या शेतकरी गफूर तुराब तडवी(वय ६३) यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.सर्पदंश होताच त्यांना सोमवारी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले परंतु अखेरीस त्यांची सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली नागपंचमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे निंबायती गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.निंबायती शिवारात गट क्र-82 मध्ये शेतात निंदनी करून ठेवलेल्या तणाची पंजे उचलण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याला निंदनीच्या पुंज्यातून निघालेल्या सापाने त्यांच्या हाताला व पायाला दंश करून गंभीर जखमी केले दरम्यान त्यांना तातडीने उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्यांची सोमवारी सायंकाळी प्राणज्योत मावळली.त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले,पाच मुली,सुना नातवंडे असा परिवार असून माजी सरपंच शमा तडवी यांचे ते वडील होते.
—–ऐन नागपंचमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे निंबायती गावात शोककळा पसरली होती.