मोठी बातमी : CNG च्या दरामध्ये तब्बल ” एवढा ” रुपयांची वाढ.
महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडली आहे. महागाई वर्षातील उच्च स्थराला जाऊन पोहोचली आहे. अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. आणि आता यामध्ये आणखी भर म्हणजे सीएनजी आणि पीएनजी या दोन्हींचेही दर आज पासून वाढले आहेत.
सीएनजी च्या दरात प्रति किलो 6 तर पीएनजीच्या दरात प्रति किलो ४ रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. आणि या वाढीमुळे आता मुंबईमध्ये सीएनजी 86 रुपये किलो तर पीएनजी 52 रुपये 50 पैसे पर किलो असे नवीन दर रात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना सीएनजीसाठी जादा पैसे मोजावे लागणार.
पेट्रोलचा तुलनेत सीएनजी मुळे खर्चात 44 टक्के बचत होत असल्याचा दावा दरवाढीनंतर महानगर गॅस कंपनीकडून करण्यात आला आहे. देशामध्ये एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत गेल्या दोन महिन्यापासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही पण दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ ही सुरू आहे. मुंबईमध्ये सीएनजीच्या दारात तब्बल ६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे तर पीएनजी च्या दरामध्ये ४ रुपयांची वाढ झाली आहे.
आता सीएनजी चे भाव प्रति किलो 86 तर पीएनजी 52 रुपये 50 पैसे एवढं पैसे मोजावे लागणार आहेत. नवे तर हे आजपासून लागू केले गेले आहेत. वाढत असलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना यामध्ये आता सीएनजीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना फटका बसताना दिसून येत आहे. मागील गेल्या वर्षभरामध्ये सीएनजी व पीएनजीच्या दरामध्ये अनेकदा वाढ झालेली आहे. त्या तुलनेत भाडे वाढ न झाल्याने मोठा फटका हा रिक्षा चालकांना बसत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला होता.
पुन्हा एकदा दरात वाढ झाल्याने प्रवासी वाढ होण्याची शक्यता आहे. जी वाहने इंधनावर चालतात त्यांचे भाडे वाढ देखील वाढण्याची शक्यता आहे. भाडेवाढ झाल्यानंतर वस्तूंच्या दरामध्ये देखील वाढ होत असते आणि या सर्वांचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना जलत असतो.