कृषी वार्ता : सोयगाव तालुक्यात कपाशीवर पडला मावा व चिकट्याचा प्रादुर्भाव.

कृषी विक्रेत्यांच्या भरवशावर शेतकरी.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे मागील काही दिवस सतत पाऊस झाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे कपाशीवर मावा तर मकावर लष्करी आळीने अटॅक केल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे तर दुसरीकडे कृषी विभागास याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे सोयगाव तालुक्यात सर्वत्र हीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे
सोयगाव तालुक्यात मंडळ कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांचे फक्त कृषी सप्ताह साजरी करण्यापुरते काम आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे पिकांवर रोगराई पसरल्याने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे परंतु याबाबत सोयगाव कृषी विभाग गंभीर नसल्याचे दिसते तालुक्यातील बऱ्याचश्या गावांमध्ये कृषी सहायकांचे दोन महिन्यापासून दर्शन न झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले हीच अवस्था सोयगाव तालुक्यातील तिन्ही मंडळात दिसून येत आहे परिणामी शेतकरी कृषी विक्रेत्यांच्या भरोशावर महागडी कीटकनाशके विकत घेऊन फवारणी करीत आहेत

सोयगाव सह संपूर्ण तालुक्यात दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मकावर अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे अन्य पिकांवर मावा पडला आहे काही शेतकऱ्यांची कपाशी पिवळी पडून पाने आखडली आहेत पिकांची वाढ ही कुठली आहे फवारणी खत व आंतरमशागतीसाठी लागणाऱ्या खर्चात आता वाढ होणार आहे यामुळे शेतकरी धास्तावले आहेत….