इतरांप्रमाणे तृतीयपंथांना मिळणार आता या विशेष सवलती. पाहा बातमी सविस्तर.

आधार कार्ड ही प्रत्येक भारतीय नागरिकाची मूलभूत गरज बनला आहे. ही आपली ओळख आहे आधार कार्ड च्या एका नंबर वरती आपले अनेक काम होत असतात. आणि याच आधार कार्ड बाबत अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय येत आहे.
जसं सर्व महिला पुरुष यांना प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड हवं असतं, सरकारी कामकाज सरकारी योजना या आधार कार्ड शिवाय होत नाहीत. यात आता तृतीयपंथी ट्रान्सजेंडर्स यांना देखील आधार कार्ड उपलब्ध होणार आहेत. हे विशेष शिबिर पुण्यात घेतलं जाणार आहे. याचा आयोजन नुकतंच केलं जाणार आहे. याबद्दलची माहिती बी क्यू आर एस संघटनेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने तृतीयपंथांसाठी आधार कार्ड शिबिराचा आयोजन केला आहे.
तृतीयपंथी म्हणून ओळखपत्र मिळवण्यासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे अशा प्रकारचा शिबिर घेण्याची गरज भासली. तृतीयपंथीना ओळख देऊन महाराष्ट्रात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 125 तृतीय पंथांना अशी ओळख प्रमाणपत्र मिळाले आहेत. तृतीयपंथी समुदायातला आधार कार्ड नसलेला जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचायचं असं त्यांनी ठरवलं.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व्यक्तींपर्यंत ही शिबिर पोहोचवायचा आहे. आधार कार्ड साठी आवश्यक असलेली कागदपत्रे सर्व तृतीया पंथांकडे असतातच असं नाही त्यामुळे त्यांना आधार कार्ड मिळण्याबाबत अडचणी येतात. हे लक्षात घेऊन अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र नाही त्यांना आमदारकी अधिकाऱ्यांच्या सहीच ओळखपत्र मिळत ते मिळवून देण्याची व्यवस्था या आधार कार्ड शिबिरात केली जाईल अशी माहिती समोर येते.