धक्कादायक बातमी : औरंगाबाद लॉजवर नको त्या अवस्थेत सापडले प्रेमीयुगल, ‘ हे ‘ आहे त्या मागचे कारण.

प्रेम विवाह करण्यासाठी आपल्या समाजामधून अजूनही मान्यता मिळालेली नाही. आणि यामुळे बरेच तरुण आणि तरुणी चुकीचं पाऊल उचलतात. आणि अनेकदा घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन हे प्रेमी युगल पळून जाऊन लग्न करतात किंवा या लग्नासाठी जर काही अडकाठी आलीच तर टोकाचं पाऊल उचलतात. कित्येक वेळा मुला मुलीच्या घरच्यांकडूनही घातपात झाल्याच्या घटना आपल्यासमोर आले आहेत.
अशीच एक बातमी सध्या समोर येत आहे. ही घटना औरंगाबाद मधुन घडल्याचे समोर येत आहे. औरंगाबाद शहरातील एका हॉटेलमध्ये एक प्रेमीयुगल मृत अवस्थेमध्ये सापडलं. याबद्दलची आणखी माहिती पोलिस विभाग करत आहे.
औरंगाबाद शहरामध्ये रेल्वे स्टेशन रोडवर एक हॉटेल पंजाब या नावाचा लॉज आहे. आणि या लॉजमध्ये एक प्रेमीयुगल एकाच रुममध्ये थांबलेले होते. 29 जुलैपासून हे दोघे त्या हॉटेलमध्ये राहत होते. सकाळी हॉटेलच्या रूममध्ये दोन्ही बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. त्या दोघांनाही सरकारी रुग्णालयांमध्ये तपासासाठी पाठविण्यात आले, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्या दोघांनाही मृत घोषित केले.
त्या तरुणाचे नाव सागर राजेंद्र बावणे असे आहे. तो शहरातील सिडको भागातील राहणारा आहे, तर त्या तरुणीचे नाव सपना अंकुश खंदारे असे असून ती शहरातील मुकुंदवाडी भागातील राहणारी आहे. या दोघांनीही आपले जीवन का संपवून टाकले ते अजून पर्यंत तरी स्पष्ट झालेले नाही. पण या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे. वेदांत नगर पोलिस याबाबतचा पुढील तपास करत आहेत.
या दोघांनी आत्महत्या केली आहे की, इतर कोणत्या कारणामुळे त्यांचा जीव गेला याबद्दलची माहितीही अजून पर्यंत समोर आली नाही. हे दोघेजण मृत अवस्थेत सापडल्याने शहरांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच हॉटेलच्या रूमवर कोणत्याही प्रकारची आत्महत्या बाबतची चिठ्ठी किंवा इतर कुठलीही माहिती मिळालेली नाही. दोघांचेही शवविच्छेदन केल्यानंतर नेमकी त्या दोघांच्या मृत्यूचे कारण काय आहे हे समोर येऊ शकते. पण तोपर्यंत मात्र रूममध्ये मिळालेला इतर गोष्टीवरून पुढील तपास सुरू आहे.