नगर वार्ता : गर्भपात का केला नाही याचा राग मनात धरून पतीने उचलले नको ते पाऊल. पहा सविस्तर

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधील ही बातमी आहे. अत्यंत धक्कादायक बातमी नगर तालुक्यात गर्भपात केला नाही म्हणून पत्नीचा पतीनं खून केल्याची घटना घडली आहे.
या पतीस जन्मठेप झाली आहे. ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यात घडलेली आहे. हि घटना 2016 साली घडली होती. दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर गर्भपात केला नाही या कारणावरून पत्नीच्या तोंडावरती उशीने दाबून तिच्या हाताला इलेक्ट्रिक वायर बांधून तिला शॉक देऊन तिचा खून केल्याप्रकरणी पतीला संगमनेरच्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
तर त्या महिलेच्या सासू आणि दिराची काहीच पुरावा मिळाला नसल्याने मुक्तता करण्यात आली आहे.
यात पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीच नावे बाळासाहेब वय वर्ष ३२ आहे. तसेच मयत महिलेचे नाव वर्षा आहे.
ती महिला दुसऱ्यांदा गरोदर राहिली होती ही माहिती पतीला कळाली त्यानंतर पती, सासू यांनी तिने गर्भपात करावा असं सांगितलं. त्यांनी ऐकलं नाही आणि त्याचाच राग मनात धरून त्यांचा खून केला आहे.