नगर वार्ता : पोलिसाने मागितली ४० हजाराची लाच, आणि सापडला LCBच्या जाळ्यात.

शेवगाव तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक ने आता धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस भ्रष्टाचारी असणारे जे कर्मचारी अधिकारी आहेत ते समोर येत आहे.
तालुका पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कर्मचारी 40 हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतला. संजय बडे पोलीस हवालदार म्हणून नेमणूक असलेले पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये आहे. जेसीबीच्या साह्याने अवैद्य रित्या मुरूम उत्खनन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच जेसीबी जप्त न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.
तडजोड अंती चाळीस हजार रुपये देण्याचं ठरलं. माळी बाभुळगाव येथील तक्रारदार यांनी याबद्दलची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवले आणि त्यानुसार सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आहे.
पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला या कारवाईमुळे पोलीस दलाची प्रतिमा, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणारा पोलीस कर्मचारी अशा पद्धतीने लाच घेऊन काम करणार असतील तर पोलीस दलाची प्रतिमा दिवसेंदिवस आणखी खराब होत जाईल.