नगर : नगर मधील तब्बल एवढा लोक होणार हद्दपार, पहा सविस्तर बातमी.

मोहरम या सणाला सुरुवात झाली या मोहरमच्या पार्श्वभूमीवरती शहरातील सुमारे पाचशे व्यक्तींवरती प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली आहे.
175 जणांना शहरातून तात्पुरत्या काळासाठी हद्दपार करण्याचा देखील एक करण्याचा प्रस्ताव आला आहे. याबाबत लवकर काहीतरी निर्णय समोर येईल अशी माहिती काही जणांकडून आली आहे .
प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक अनिल काकडे यांनी सांगितले. मोहरम सणाला सुरुवात झाली या उत्सव काळात कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस कारवाई करणार आहेत.
पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून नियोजन सुरू केला आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील 155 व्यक्तींना सीआरपीसी 107 प्रमाणे नोटीस देण्यात आली. यामध्ये कोतवाली मध्ये 53 ठाण्यामध्ये 62, भिंगार त्यामध्ये 40 या व्यक्तींचा समावेश आहे.
यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 24 गुन्हेगारांना सीआरपीसी 110 प्रमाणे नोटीस देण्यात आल्या आहेत. उत्सवामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस प्रशासन तयारीला लागला आहे.