धक्कादायक : १० वर्षाच्या मुलाने टिव्ही-मोबाईल वरील क्राईम शो पाहून उचलले नको ते पाऊल, पहा बातमी सविस्तर.
अत्यंत विचित्र असा प्रकार पहायला मिळतोय. मुल आहेत ते सोशल मीडियाचा वापर करतात. टीव्ही चा मोबाईल वापर करतात आणि या वरती ज्या गोष्टी पाहात आहेत त्या गोष्टीचे प्रमाण जास्त वाढले आपण जे पाहतो याचा आत्मसात करण्याचं काम करत असतात. लहान वयातच घराबाहेर खेळण्याची मस्ती करण्यासाठी ही मुले आता गुन्हेगारीकडे वाढत चालली आहेत. आणि त्यातूनच विचित्र घटना घडत आहेत.
असाच एक धक्कादायक प्रकार चंद्रपूर या ठिकाणी झाला दहा वर्षांच्या मुलानं स्वतःचेच अपहरण झालं असा बनाव करत धक्कादायक कथा रचल्या. आणि विशेष बाब म्हणजे ही कथा टीव्ही शोच्या माध्यमातून त्याला सुचली व ते पाहून त्याची कल्पना शक्ती इतकी मजबूत झाली की, त्याला स्वतःच अपहरण झाला असा बनाव करत सर्वांनाच कामाला लावलं नाव आहे.
हे पोलिसांच्या देखील लवकर लक्षात आलं नाही. पोलिसांनी सर्व महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र तरीही काहीच सुगावा लागला नाही. चंद्रपूर शहरालगतच्या येथे घडलेल्या घटनेतील पोलीस आणि पालक सगळेच बुचकळ्यात पडले. मुलाचा अपहरण कोणी आणि का केलं हा प्रश्न पडला होता. अखेर पोलिसांनी या मुलाला विश्वासात घेतलं आणि सर्व प्रकार विचारला तेव्हा त्या मुलानं जो खुलासा केला तो धक्कादायक होता.
तो म्हणाला मी शाळेत गैरहजर होतो आणि शाळेत गेलो नाही. म्हणून आई-बाबा रागवतील म्हणून त्यानं हा सगळा प्रकार केला. आणि हा सर्व प्रकार एका क्राईम शो मध्ये पाहिला होता. चंद्रपूर मधील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. मात्र आपली मुले देखील मोबाईल टीव्ही चा वापर जास्त करत असेल तर त्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांनी ती माहिती आत्मसात करू नये नाहीतर अशा गोष्टी समाजात घडतात.