” जे भेटत ते गपचूप खा, नाहीतर…” अस रागात आई म्हणाली आणि पुढे तुम्हीच पहा काय घडले.

स्वयंपाक घरामध्ये बहुतेक पदार्थ बनवताना त्यामध्ये तेलाचा वापर हा केला जातो. सध्याच्या वाढत्या महागाई मध्ये तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होते. तेलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर डायेट करणारे फिटनेस फ्री आरोग्याची अधिक काळजी करणारे हे लोक तेलापासून जरा लांब राहतात. तेलापासून जी कुठलेही पदार्थ बनवले जातात याचा सेवन ते लोक कमी करत असतात. ही लोकं कमीत कमी तेलातील पदार्थ खाण्यात रस दाखवतात.
या बातमीतही असंच काहीसं घडलं आहे. या बातमीमध्ये डायट करणारा मुलगा त्याच्या आईला जेवणामध्ये कमी तेलाचा वापर कर, माझ्या जेवणात कमी तेल टाक असाच सल्ला देतो. आणि हा सल्ला दिल्यामुळे त्याची आई चांगलीच रागवते आणि या रागात लेकाला चांगला धडा शिकवते. त्याच्या आई व मुलाचा वाद झालेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
त्याची आई स्वयंपाक बनवत असते स्वयंपाक बनवत असताना हा त्या ठिकाणी जातो आणि आई ला सांगतो की, ” आई माझ्यासाठी जे खायला बनवणार आहे त्यामध्ये कमी तेलाचा वापर कर ” आणि हे ऐकून त्याची आई संतप्त होते आणि पुढे काय घडते ते आपण पाहू,
सदरील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आई किचनमध्ये बेसनाची पोळी बनवत असते. आणि त्याच वेळी मुलगा तिथे येतो आणि आईला त्या बेसनाच्या पोळी मध्ये तेल न टाकण्याचा सल्ला देतो त्याच वेळेस आई म्हणते की, ” मग बेसनाची पोळी पाण्यात बनवू का ? तेल नाही वापरलं तर ते बनणार तरी कसं ? थोडं तेल तर टाकावं लागेल ना ? ” अस ती रागात त्याला सांगते. हे बोलणं ऐकून तो आईला म्हणतो की, ‘ आई जर ते तेलाचं मी खाल्लं तर माझ्या संपूर्ण डाएटचा सत्यानाश होईल. ‘
लेकाचं हे वाक्य ऐकून आई आणखी रागाने बघते आणि म्हणते, ” मग जर असं असेल तर मग तूच तुझ्या हाताने बनव. आणि स्वतः जेव्हा बनवतो त्यावेळेस जगभरातील सगळे मसाले टाकतो तेव्हा तुला नाही समजत का ?” आणि एवढ्यावरच थांबत नाही तर म्हणते की, ” जेव्हा तू करतो तेव्हा काही होत नाही, आणि मी जेव्हा चांगलं देशी तूप वापरून, घरातील चांगलानाश्ता करते तर तो तुला चांगला वाटत नाही. बाहेर जेव्हा बर्गर खातो त्यावेळेस तुझा फॅट वाढत नाही का ?
यावर मुलगा म्हणतो की, ” आई त्या तुपामध्ये ही खूप फॅट असतं ” हे ऐकून आईच्या रागाचा पारा इतका वाढतो की ती लेकाला मारण्याची धमकी देते आणि म्हणते, ” तू चमचा खा. बेसन पोळी भेटणार नाही जे मिळतं ते गप्प पणे खा.” असं बोलून ती लेकाची बोलतीच बंद करते.