नगर ब्रेकिंग : ” तू तुझ्या नवऱ्याकडे जाऊ नकोस, तुझ्या सोबत लग्न करीन…..” पहा बातमी सविस्तर.

जामखेड, अ.नगर :
अध्यात्माला काळीमा फासणारी घटना घडलीय. ही घटना जामखेड तालुक्यात घडली मठाधिपतीचा विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. सोन्याचे दागिने घेऊन देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांनी अत्याचार केल्याबाबत जामखेड तालुकात एका महिलेनं खर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सदरील महिलेचा नवरा दारू पिऊन त्रास देत असल्याने पीडित महिला माहेरी आई-वडील यांच्याकडे जामखेड तालुक्यातील एका गावात राहते. हनुमान गडावर गेल्यानंतर अनेक अडचणी दूर होतात असं समजल्यानंतर ती महिला तिथे जाऊ लागली. आठ दिवसाला हनुमान गडावरती वारी करत होती. आठवड्याच्या वारीला गेल्यानंतर ती महिला कधीकधी हनुमान गडावर मुक्कामी सुद्धा राहात होती. त्यामुळे महाराजांसोबत तिची चांगली ओळख झाली होती.
रात्रीच्या वेळी खाडे महाराज तिला खोलीमध्ये बोलून पाय चेपायला लावायचे. खाडे महाराजांची मुलगी ज्योती ही देखील महाराजांनी सांगितले तर ते ऐकत जा असं सांगत होती. त्यानंतर महिलेचे एका नातेवाईकाच्या गावी महादेव मंदिराच्या कामासाठी बुवासाहेब खाडे आले असता तिथे मुक्कामी असताना खाडे महाराज याने बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवले. कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
तू तुझ्या नवऱ्या कडे जाऊ नकोस तुला दागिने करून देईन, तुझ्या सोबत लग्न करीन, तुझ्या मुलांना चांगलं सांभाळेल, मुलांच्या नावावर पाच एकर जमीन करेल असा खोटी वाचन देऊन तो अत्याचार करत राहिला. 12 जुलै 2022 रोजी रात्री खाडे महाराज यांनी आणखी दागिने करून देईन असं म्हणत बळजबरीनं संबंध ठेवले. या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी खाडे महाराजांनी अत्याचार केले आहे असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील या घटनेचा अधिक तपास करत आहे.