व्हायरल : वेगवेगळ्या पोज देत असताना तरुणाचा पाय घसरतो आणि क्षणात होत्याच नव्हत झाल. पहा व्हिडिओ.

आजकालच्या तरुणांना अतिउत्साह असतो, एखाद्या गोष्टीबद्दल जर आवड निर्माण झाली तर ती पूर्ण करण्यासाठी काही थराला जातात. मग ते चुकीचा असो अगर वाईट पण ती गोष्ट पूर्ण करणार. याचा ते पण उचलतात आणि हे असं वागणं कधी कधी स्वतःच्या अंगलट येतं. नको ते धाडस करण्याच्या प्रयत्नांमध्ये कित्येक तरुण आणि तरुणी यांनी आपला जीव गमावला आहे.
सदरच्या बातमीमध्ये देखील असेच काहीसे घडले आहे. या बातमीत एक धक्कादायक अशी घटना घडली आहे. ही घटना तामिळनाडूमधील कोडाईक जिल्ह्यामधील आहे. एक तरुण फोटो काढण्यासाठी म्हणून एका धबधब्यावर जातो. तिथे तो फोटो काढत असताना त्या तरुणाचा तोल जाऊन तो मुलगा धबधब्यात कोसळतो आणि पाण्याचा प्रवाह जास्त जोरात असल्याकारणाने तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जातो.
ही सगळी घटना काळजाचा ठोका चुकवणारी आहे. सदर घटना ही तरुणाच्या मित्राच्या कॅमेरामध्ये कैद झाली आहे. सदरील धबधब्यात पडलेला बेपत्ता तरुन याचं नाव अजय पंडियन असे असून तो सापडलेला नाही. अग्निशमन दलाच्या बचावाकडून या तरुणाचा शोध अजूनही सुरू आहे. काळजाचा ठोका चुकवणारा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरती चांगल्या प्रमाणात व्हायरल होत आहे तमिळनाडूमधील कोडायल जिल्ह्यांमधील ही दुर्देवी घटना घडली असून पंडियन नावाचा युवक फोटोसाठी पोज देत होता. आणि फोटोसाठी पोज देत असताना धबधब्यात पडला आणि बेपत्ता झाला.
सदरील घटना त्याच्या मित्राच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे आणि नंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावरती भरपूर प्रमाणात वायरल देखील झाला आहे. या व्हिडिओमध्ये सदरील तरुण धबधब्याच्या अगदी जवळ जाऊन ना ना प्रकारच्या पोज देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान या पोज देत असताना धबधब्याच्या जवळ पोहोचल्याच या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या मित्राला व्यवस्थित फोटो घेण्यासाठी इशारा देखील करत असल्याचे दिसत आहे. आणि त्यानंतर तो एक मोठा दगड वरून खाली जातो त्याचप्रमाणे त्याचा मित्र देखील त्या तरुणाचा शोध घेण्यासाठी त्याला फॉलो करत असतो आणि तो तरुण खाली उतरल्यानंतर वेगवेगळ्या पोज देतो.
वेगवेगळ्या पोज देत असताना अचानक त्या तरुणाचा पाय घसरला आणि तोल जाऊन तो धबधब्यात पडला. तो पडत असताना त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. मात्र जवळच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला दिसत आहे. सगळे होत असताना याचा मित्राचा किंचाळण्याचा आवाज देखील या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला आहे. याबाबतची घडलेली घटना त्याचा मित्र स्थानिक पोलिसांना देतो माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होतात गेल्या तीन दिवसापासून बचत कार्य सुरू असून अजून देखील त्या मुलाचा शोध लागलेला नाही.
आपण देखील पर्यटनासाठी म्हणून तर कुठे जात असाल, तर आपणही या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. एका छोट्याश्या चुकीने आपला जीव देखील जावू शकतो. या व्हिडिओ मधील तरुणाने विचार देखील केला नसेल कि त्याच्या सोबत असे काही होईल म्हणून पण क्षणार्थात होत्याच नव्हत झाल आहे हे आपल्याला सदरील व्हिडिओ मध्ये पाहायला मिळत आहे.