बीड : राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत अविनाश साबळे याने 3000 मिटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.

बीडच्या सुपुत्राणं कमाल केलीये राष्ट्रकुल स्पर्धेत बहुमान मिळवत ऐतिहासिक कामगिरी. ही यशोगाथा आहे अविनाश साबळे याची हा भारतीय सैन्यात करिअर करत आहे तसेच ट्रॅक आणि फील्ड अविनाश साबळे हे तीन हजार मीटर स्टीपलचेस या स्पर्धेसाठी प्रसिद्ध आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदक मिळवण्याची घोडधोड सुरू होती, यात बीडच्या शेतकरी पुत्रांन राष्ट्रकुल स्पर्धेत कमाल केली. अविनाश साबळे 3000 स्टीपलचेंज या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत रोप्य पदक मिळवला. मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य हे गुण अंगी असतील तर शून्यातून विश्व निर्माण करण्यात येत. बीडच्या गाव खेड्यातील ऑलिंपिक धावपटू अविनाश साबळे यांन हे सिद्ध करून दाखवलाय.
अविनाश भारतीय सेना दलात कार्यरत आहेत. ट्रॅक आणि फिल्ड ऍथिलिटिक यासाठी ते प्रसिद्ध आहेत. 13 सप्टेंबर 1994 रोजी त्यांचा जन्म झाला. बीड जिल्ह्यातील मांडवा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शेतकरी आहेत. वडिलांचे नाव मुकुंदा साबळे, भाऊ योगेश साबळे, अविनाश यांनी सुरुवातीचे शिक्षण गावातील सरकारी शाळेत घेतलं. आणि पदवीचे शिक्षण पुण्यातून घेतला.
अविनाश सध्या आपल्या परिवारासोबत बंगरूळ येथे राहतात. 2011 मध्ये अकरावीचे शिक्षण झाल्यानंतर ते सैन्यात ते क्रीडा प्रकारात भाग घेऊ लागले. त्यानंतर 2015 मध्ये आर्मी सर्विस टीम साठी क्वालिफाय केलं होतं. त्यानंतर दोन वर्षाने 2017 मध्ये क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप मध्ये देखील सहभाग घेतला होता. मग सातत्याने चांगले प्रदर्शन केलं. सध्या ते सेनादलात ज्युनिअर कमिशन ऑफिसर आहे..