बाप रे : लहान मुलांनी अजगराच्या तोंडातून कुत्र्याला वाचवण्यासाठी पहा हे काय केले.

अबब एखादं जनावर पाहिलं की आपल्या अंगावरती काटा येतो, मात्र या जनावरापासून एका कुत्र्याला वाचवण्यासाठी दोन चिमुकल्या मुलांनी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. याला वाचवण्यासाठी या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
एका सापाने अचानक या कुत्र्याला विळखा घातला आणि घट्ट मिठी मारून खाली पाडलं, त्या कुत्र्याला वाचवायचं म्हणून दोन मुले पुढे सरसावली आहे. त्या अजगराला काठीन हातानं काढण्याचा प्रयत्न केला. दगड, लाकूड हातात घेऊन जसे फेकून मारता येईल तसं मारलं जेणेकरून अजगराचा विळखा सैल होईल. सदरील व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता कि त्या अजगराने त्या कुत्र्याला किती घट्ट मिठी मारली आहे.
त्या अजगराच्या घट्टमिठी मारल्याने ते कुत्र ओरडत आहे, त्याला हालत नाही येत नाहीये त्यानंतर एक व्यक्ती हातात काठी घेऊन अजगराचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र तरीदेखील हा अजगराचा विळखा सुटत नाही. शेवटी ती व्यक्ती अजगराची शेपटी धरून ओढते तेव्हा कुठे विळखा सैल करण्यात यशस्वी होतात.
अजगराच्या तोंडाकडील भाग आपल्या हातात धरतात मग ही मुले अजगारावर तुटून पडतात. वयाने आणि ताकतीने लहान असून देखील हि लहान मुलं त्या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या जीवाची बाजी लावत कुठलीही भीती न ठेवता त्या कुत्र्याची सुटका त्या अजगारापासून पासून करतात.