खळबळजनक : ऑगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला जरंडीचे हुतात्मा स्मारक अंधारात…

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव, दि.८..
स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृती जगविण्यासाठी शासनाने कोट्यवधी रु खर्च करून उभारण्यात आलेल्या जरंडी ता सोयगाव येथील हुतात्मा विश्वनाथ कालिदास राजहंस यांच्या नावाचे भव्य स्मारक उभारले आहे या स्मारकाला झळाळी यावी यासाठी ग्रामपंचायतने विक्रमी वृक्ष लागवड करून या स्मारकाला वैभव प्राप्त करून दिले मात्र या स्मारकाचा वीज पुरवठा खंडित असल्याने आगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला ही भव्य स्मारकाची स्मृती मात्र अंधारात घटका मोजत असल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला आहे.एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने लाखो रु खर्च करण्याचा चंग बांधला आहे या स्वातंत्र्य दिनाला ७५ वर्ष पूर्ण होत आहे त्यासाठी यंदाचा स्वातंत्र्य दिवस राज्यभर भव्यदिव्य साजरा करण्यात येत आहे मात्र स्वातंत्र्याच्या स्मृती जगविणाऱ्या या स्मारकाला जिल्हा प्रशासनाकडून वीज जोडणी साठी कोणतेही प्रयत्न केल्या गेलेले नसल्याचे दिसून आले आहे जरंडीच्या या हुतात्मा स्मारकासह मैदानाचा ताबा जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचेकडे आहे परंतु तालुका तहसीलच्या महसूल विभागाने अद्यपाही या स्मारकाचा वीज जोडणीसाठी महावितरणला कोणतेही पत्र दिलेले नाही.त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे
—-जरंडी ता सोयगव येथील हुतात्मा स्मारकाचा वीज देयकांच्या थकबाकी पोटी वीज पुरवठा खंडित झालेला नसुन या हुतात्मा स्मारकाचे चक्क वीज मिटरच चोरी झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे तालुका प्रशासनाने याबाबत मात्र सोयगाव पोलिसात फिर्याद का दिली नाही किंवा पोलिसांनी याबाबत गांभीर्य का घेतलं नाही असाही प्रश्न उपस्थित झाला आहे