दुखःद : शेतात फवारणीसाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा या कारणाने झाला मृत्यू, पाहा काय आहे कारण.

सध्या पावसा पाण्याची दिवस चालू आहेत. पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर काही शेतकरी वर्ग शेतात असलेल्या पिकांवर औषध फवारणी करतात. पण हे औषध फवारणी करत असताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची असते. जेणेकरून हे विषारी औषध आपल्या नाका तोंडात जाऊ नये आणि त्यामुळे आपल्याला काही इजा होणार नाही.
पण परभणी जिल्ह्यामध्ये एक घटना घडली आहे. शेतातल्या कापसाच्या पिकावर औषध फवारणी करायची असते आणि म्हणून हा तरुण शेतकरी कीटकनाशकाच्या डब्याचे झाकण उघडतो आणि झाकण उघडतात ते कीटकनाशक त्याच्या तोंडात जाते. हे कीटकनाशकाच्या तोंडात जाण्याने 19 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदरील घटना सेलू तालुक्यातील आहे. हि घटना रविवारी घडली आहे.
योगेश गणेश मगर असे या मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. योगेश हा रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कापसाच्या पिकावर औषधाची फवारणी करायची म्हणून जातो. त्या फवारणीची पूर्वतयारी म्हणून तो त्या औषधाच्या डब्याचे झाकण उघडतो, आणि झाकण उघडताना त्या कीटकनाशकचा काही अंश त्याचा तोंडात जातो. आणि यानंतर या योगेशला मळमळ, उलटी, चक्कर असं जाणवायला लागलं. योगेशचा त्रास वाढत गेला आणि मग योगेशला उपचारासाठी सेलू येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला.
खाजगी दवाखान्यांमध्ये योगेश्वर उपचार चालू असताना रविवारी दुपारी ४ च्या दरम्यान त्याचा मृत्यू होतो. सेलू ठाण्यात या प्रकरणी आकस्मात मृतूची नोंद केली गेली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक गाडेवाढ कर्मचारी गौस यांनी भेट दिली.
पिकांवर फवारणी करत असताना योग्य ती काळजी घेतली नाही, म्हणून 19 वर्षीय योगेशचा मृत्यू झाला. औषधाची फवारणी करत असताना व्यवस्थित काळजी घेतली असती, तर योगेश सोबत आज ही घटना घडली नसती. त्यामुळे आपण शेतात औषधांची फवारणी करत असताना तोंडात ते औषध जाणार नाही याची पूर्व ती तयारी करावी. शक्यतो तोंडाला आणि नाकाला मास्क लावावे जेणेकरून औषधाचा वास किंवा औषधाचा अंश आपल्या नाका-तोंडात जाणार नाही.