हृदयद्रावक : मांडवी जवळील जुनोनी शिवारात विज पडून 24 बकऱ्या ठार एक कुत्रा ठार.

राज्यभर अनेक ठिकाणी धो धो पाऊस आहे. आणि पावसाबरोबर नदी नाल्यांना पूर, वीज पडणं या नैसर्गिक आपत्ती देखील येत आहेत. यातच मांडवी शिवारात वीज पडली. यात वीज पडून तब्बल 24 बकऱ्या एकाच वेळी ठार झाल्यात त्यामुळे हा शेतकरी आर्थिक संकट संकटात सापडला. त्यात एका कुत्र्याचा देखील समावेश आहे दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
जवळील मांडवी गावाला लागून असलेल्या जुनोनी शिवारात आज दुपारी 3.25 ला वीज पडून 18 बकऱ्या, सहा मेंढ्या व एक कुत्रा ठार झाला. आज दुपारी आभाळ भरून आले व पावसाला सुरुवात होताच अचानक विजा कडाडल्या. झाडाखाली असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वीज पडल्याने सुमारे 18 शेळ्या सहा मेंढ्या एक कुत्रा दगावल्याची माहिती आहे.
दुपारी आभाळ भरून आल्याने शेळी चारणारे गुराखी बंडू कुमरे व हनुमंत चुकाबा हे दोघे बकऱ्यांना झाडाखाली घेऊन जाऊन बाजूला थांबले. अचानक झाडावर वीज पडली यामध्ये 25 जनावरे ठार झाल्याची माहिती आहे. बंडू कुमरे याचेकडे चराई करिता 57 बकऱ्या असल्याची माहिती आहे. तर हनुमंत चुकाबूतलावार यांचे कडे पंधरा शेळी व 45 मेंढी एकूण 60 नग चराई करिता होते. सदर शेळ्या उस्मान खान पठाण, हनुमंत तथा मांडवी येथील शेतकऱ्यांच्या असल्याची माहिती आहे.