पावसात चालत्या गाडीवर पडला विजेचा खांब, गाडीवरील तरुणाची अशी झाली अवस्था. पहा व्हिडिओ सविस्तर.

संकट कधी आणि कसं ओढावेल ? सांगता येत नाही. कारण सध्या पावसाचे दिवस आहेत. अनेक दुर्घटना घडत असतात यातच पालघर येथे एक दुर्घटना घडल्या. पालघरमधील बोईसर नवापूर रोडवरील कोलवडे येथे एक दुर्घटना घडली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव योगेश पागधरे असा आहे. हा गंभीररित्या जखमी झाला आहे. योगेशला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. योगेश सोबत काय घडला. हे पाहुयात,
योगेश.बाईकवरून जात असताना रस्त्यावरील विजेचा खांब अचानक पडला. आणि दुचाकीवरती असणारा योगेश यामध्ये जखमी झाला. विजेचा खांब पडल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र सुदैवानं योगेश या मध्ये वाचला आहे. सध्या योगेशवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचार् यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि त्यामुळे तत्परता दाखवच योगेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. अपघातानंतर दुचाकी रस्त्यावर खांबाखाली पुर्णपणे दाबली गेली होती. सुदैवानं मृत्यूला चकवा देतात दुचाकीस्वार योगेश हा मृत्युच्या दारातून पुन्हा परतला आहे.