अबब : या राखीची किंमत ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल, हातात बांधावी कि लॉकर मध्ये ठेवावी.

हिंदू संस्कृतीमध्ये भावा बहिणीचे प्रेम दाखवण्यासाठी एक विशेष असा सण असतो आणि तो म्हणजे रक्षाबंधन. या रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते, आपले रक्षण करण्याची ती भावाला बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते. तेव्हा तो भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी कटिबद्ध झालेला असतो. राखी हे त्याचं प्रतीक आहे प्रत्येक बहीण रक्षाबंधन ची वाट पाहत असते. आणि प्रत्येक भाऊ आपली बहीण आपल्याला या दिवशी राखी बांधेल, आपली राखी कशी असेल याची त्याला आतुरता असते. रक्षाबंधन या सणाला अत्यंत महत्त्व आहे या सणाला नारळी पौर्णिमा असे देखील म्हटले जातात.
थाटामाटात उत्साहात प्रत्येक घरांमध्ये रक्षाबंधन साजरा केला जातो. अनेकदा राखी कशी असेल तर राखेच्या बदल्यात भाऊ आपल्याला कुठलं गिफ्ट देईल याची उत्सुकता प्रत्येक बहिण-भावाला असते. बहीण भावाच्या अतूट आणि पवित्र नातं या रक्षाबंधनच्या सर्वांना फुलून येतात. यामुळेच साध्या रेशमी धाग्याला हे या दिवशी अत्यंत महत्त्व असतं. आपल्या भावाच्या हातावर सर्वात सुंदर राखी बांधावी यासाठी बहिणीला सगळा बाजार पालथा घालत मनासारखी राखी खरेदी करण्यासाठी फिरत असतात.
मात्र आता बाजारात अशी राखी आलीये जी किंमत ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल. देशातील सर्वात महागडी राखी गुजरातच्या बाजारपेठेत पाहायला मिळतील. याची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. राखी नेमकी हातात बांधायची की लॉकर मध्ये ठेवायची असा प्रश्न त्या भावाला उपस्थित राहिल. ही राखी नेमकी कुठे आणि कशी बनवली गेली हे देखील आपण पाहूयात मात्र देशातील सर्वात महागडी राखी म्हणून या राखीचं नाव चर्चिला जात आहे.
या राखी ची किंमत तब्बल पाच लाख रुपये इतकी आहे. दुकानात धाग्या पासून बनवलेल्या राख्या ते सोने चांदी प्लॅटिनम डायमंड या जडलेल्या राख्या सर्वत्र उपलब्ध असतात. त्यांच्या सौंदर्याचा डिजाईनचे कौतुक केलं जातं. तर पाच लाखाच्या राखीन आता सर्वांचेच लक्ष वेधले या राखी मध्ये सोने-चांदी डायमंड प्लॅटिनियम चा वापर केला गेला आहे. गुजरात शहरातील सुरत शहरात एका बहिणीने ही भव्यदिव्य महागडी राखी आपल्या भावासाठी खास ऑर्डर देऊन पाच लाखाची राखी बनवली आहे. 2018 मध्ये नाशिक मधील एका ज्वेलरीने बनवली होती ती राखी बनवण्यासाठी सुमारे पंचवीस दिवस लागले होते आणि त्यानंतर आता गुजरात मध्ये पाच लाखाचे राखी बनवली गेली.