नगर ब्रेकिंग : सरकार बद्दल या भाजपा आमदारानेच पाहा काय केलं हे भाष्य.

मा. मंत्री आ. राम शिंदे त्याच्या पदरीं आमदारकी पुन्हा पडली. तेव्हा पासून नव्या जोमाने ते काम करू लागले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, “आता मी पण पुन्हा आलो अन् आपलं सरकारही परत आलं. ज्या दिवशी निवडून आलो, त्याच दिवशी कालवा सुरू झाला. मागील तीन वर्षांत नियमित पाणी येईल असं वाटलं होतं. माझ्याकडून तुमची हेळसांड झाली असेलही, पण आता इतकी होईल असं वाटलं नव्हतं. मी जलपूजन करत नाही… मी पाणी पाठवून द्यायचं काम करतो.. आणि हे पाणी पोचलंय का नाही, ते पाहायला मी आलो आहे, असे ते म्हणाले … यापूर्वी त्यांनी पाण्यावर अनेक विधान केली आहेत ते चर्चेत ही राहिले आहेत.
करमनवाडीकरांच्या हस्ते जलपूजन झाल्यानंतर राम शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत असतानाच आधुनमधून आ. रोहीत पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
” आपलं गाऱ्हाणं ऐकणारा माणूस आपलाच असतो, आता तर तुमच्या घरचा माणूस आमदार झालाय. आता चॉकलेट-गोळ्यावरचे दिवस जातील. ”शेतकऱ्यांचा कळवळा आल्याच्या फक्त बातम्या झळकतात, पण आता इथून पुढे शेतकऱ्यांची कोणी थट्टा करायची नाही” पंगतीला बसायला आणि बुंदी संपायला मी थोडीच खडसे आहे,” असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
ग्रामस्थांनी शिंदे यांचे फटाके फोडून व घोषणाबाजी करून जल्लोषात स्वागत केले. कर्जत जामखेड मतदार संघाला दोन दोन आमदार मिळेल म्हणून विकासकामांना सुगीचे दिवस येतील यात काही शंकाच नाही.