धक्कादायक : रस्त्याने जात असलेल्या महिलेसोबत पहा मोकाट बैलाने काय केले,पाहा हा व्हायरल व्हिडिओ.

आजकाल सगळेच जण गाडीवर किंवा रस्त्याने जात असताना मोबाईल खेळत चालत असतात. आज पास काय चाललंय काय नाही चाललं याचं कोणावरही लक्ष नसतं, पण हे असं लक्ष नसणे किती घातक असू शकतं याचा अंदाज आपल्याला या बातमीतून येईल. आपण रस्त्याने चालत असताना आसपास देखील आपल लक्ष असलं पाहिजे. कारण जर आपण रस्त्याने चालत असेल तर आपल्या जवळपास एखादं मोकाट जनावर तर नाही ना याकडे लक्ष दिले पाहिजे. आणि विशेषता त्या मोकाट जनावरांमध्ये जर बैल दिसला तर आपण वेळे आधीच सावध होणे गरजेचे आहे. कारण हे जनावर कधी कोणावर भडकून धावून येईल हे कोणालाच माहीत नसतं.
या मोकड जनावरातील बैल जर समजा रागवलेला असेल तर त्याच हे रूप पाहून चांगल्यातल्या चांगल्या लोकांना घाम येतो कारण हे मोकाट बैल अंगाने सुद्धा धष्टपुष्ट असतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. यामध्ये या बैलाचे भडकलेले रूप आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
रस्त्यामध्ये या मोकाट जनावराला एक महिला रस्त्याने जात असताना सापडली. आणि हा बैल त्या महिलेच्या दिशेने जोरात जाऊन त्या महिलेला अशा प्रकारे हवेत फेकतो की, ते पाहून तुमचा आतला आत्मा सुद्धा घाबरून जाईल. ही धक्कादायक घटना बाजारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असून हि मध्य प्रदेश मधील खांडवा या ठिकाणची आहे.
यामधील माहिती अशी की, बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक मोकाट जनावर म्हणजेच बैल हा रस्त्यावर चिडलेल्या अवस्थेत असतो. आणि एक महिला दुबे कॉलनीतील रस्त्यावरून जात असते आणि ही महिला जात असताना चिडलेल्या बैलाने त्या महिलेवर हल्ला केला आहे. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या दोन वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद सुद्धा झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसेल की, रस्त्यावर आधीच दोन बैल आहेत बाजारामध्ये म्हणावं अशी हालचाल नाही. त्यानंतर एक बैल धावतो ज्याला पाहून एक मूल त्या ठिकाणावरून लगेच जीव वाचवण्यासाठी पळून जातो. पण त्याच क्षणाला बैल मात्र त्या रस्त्याने चालणाऱ्या महिलेला लक्ष बनवतो. ती महिला रस्त्याने जात असताना हा बैल तिच्या पाठीमागून येऊन तिला जोरात मारतो आणि शिंगावर उचलून घेऊन हवेत फेकून देतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या महिलेची अवस्था पाहून थरकाप सुटेल.
सदरील व्हिडिओमध्ये या बैलाने महिलेला किती जोरात फेकले आणि त्यानंतर ती महिला त्या बैलाच्या धडकेमुळे वरती फेकली जाऊन पुन्हा खाली आपटली जाते. जेव्हा हा बैल तिला वरती फेकतो त्यावेळेस ती महिला अगदी खेळण्यासारखी हवेत उडून जमिनीवर खाली पडते. एवढे होऊनही तो बैल पुन्हा त्या महिलेला ओढण्याचा प्रयत्न करत असतो, हे सगळे घडत असताना वाटेने जाणारे लोकही घटना पाहत असतात. पण त्यांच्याकडे काहीच पर्याय नसल्याने ही लोकं नी काहीच केलं नाही. पण अगदी काही सेकंदांनी तो बैल त्या ठिकाणाहून निघून जातो आणि त्यानंतर त्या बैलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले जाते.
यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की, ही घटना एकदम अचानक घडलेली आहे कुठल्याही प्रकारचा अंदाज त्या महिलेला नव्हता की, रस्त्याने जात असतील असताना आपल्याला एखादा बैल येऊन धडकेल आणि आपली अशी अवस्था होईल. त्यामुळे रस्त्याने जात असताना आपण इतरत्रही पाहिलं पाहिजे त्यामुळे अशा घडणाऱ्या घटना किमान घडणार नाहीत.